Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात

Ratnagiri: रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथील शंभर हेक्टर जागेवर भव्य 'मैंगो पार्क' उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने हालचाली करत भूसंपादन प्रक्रिया पार पाडण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2026 | 03:40 PM
uday samant

uday samant

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरीत ‘मँगो पार्क’साठी भूसंपादन वेगात
  • ३०० जमीनमालकांना ८० कोटींचा मोबदला वाटप
  • ‘मँगो पार्क’ प्रकल्प ठरेल मैलाचा दगड
प्रकाश वराडकर/Ratnagiri: रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मॅंगो पार्क’ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत वेगाने पार पड़त आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या सुमारे १०० हेक्टर जागेच्या मोबदला वाटपाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ३०० जमीन मालकांना ८० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. उर्वरित २५ टक्के मोबदला वाटपाची प्रक्रियाही सध्या वेगाने सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहे. यासंदर्भातील महत्त्वाची माहिती महसूल विभागाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे, प्रशासनाच्या या जलद कामगिरीमुळे स्थानिक जमीन मालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संपूर्ण भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असा ठाम विश्वास महसूल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला आणि पर्यटनाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत

‘मँगो पार्क’ प्रकल्प ठरेल मैलाचा दगड
रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथील शंभर हेक्टर जागेवर भव्य ‘मैंगो पार्क’ उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने हालचाली करत भूसंपादन प्रक्रिया पार पाडण्यात आली. कोकणातील आंबा, काजू, कोकम आणि कणस यांसारख्या स्थानिक फळावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी उभारले जाणार आहेत.

या प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांच्या हाताला बेट व्यवसाय व नौकरी मिळवून देणे ह्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे स्थानिक स्तरावर अर्थकारणाला मोठी गती मिळून रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यास मदत होईल. कोकणातील कृषी उत्पादनांना योग्य बाजारपेठ आणि मूल्यवर्धन मिळवून देण्यासाठी हा ‘मैंग्रो पार्क’ प्रकल्प मैलाचा दगड ठरेल.

स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी
या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सुमारे १२० कोटी रुपयांचा निची उपलब्ध करून दिला आहे, या उपलब्ध निधीतून महसूल यंत्रणेमार्फत सर्व पात्र जमीन मालकांना पारदर्शक पद्धतीने मोबदला वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या उर्वरित जमीन मालकांच्या कागदपत्रांची छाननी आणि पडताळणीचे काम अंतिम टप्यात सुरू आहे. येत्या महिनाभरात ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून सर्व पात्र बाधितांना त्यांचा उर्वरित मोबदला वितरित केला जाईल.

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

Web Title: Ratnagiri niwendi mango park 300 land owner 80 crore revenue uday samant ratnagiri tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • ratnagiri news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत
1

Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत

Ratnagiri: खबरदारी हीच सुरक्षितता! रत्नागिरी शहरात भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी पालिकेने…
2

Ratnagiri: खबरदारी हीच सुरक्षितता! रत्नागिरी शहरात भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी पालिकेने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.