Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! एमपीएससीच्या परिक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला

नुकतेच फॉरेस्ट ऑफिसर झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळला, मित्रासोबत गेल्यानंतर मुलगी सहा दिवसांपासून होती बेपत्ता, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात मिसींग दाखल

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 18, 2023 | 08:04 PM
धक्कादायक! एमपीएससीच्या परिक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला
Follow Us
Close
Follow Us:

अक्षय फाटक, पुणे : स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून (एमपीएससी) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) पोस्ट काढलेल्या २६ वर्षीय तरुणीचा राजगड किल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. याघटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून, जिल्हा हादरून गेला आहे.

दर्शना दत्तू पवार (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. काही दिवस पुण्यात देखील तिने क्लास केले होते. त्यानंतर ती गावी जावून सेल्फ स्टडी करत होती. ती  नुकतीच स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तीसऱ्या क्रमांकाने पास झाली होती.

दरम्यान, पुण्यातील एका अकादमीच्यावतीने तिचा सत्कार समारंभ होता. ९ तारखेला त्यानिमित्ताने ती पुण्यात आली होती. तिच्या नर्हे येथील एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी ती मैत्रिणीला सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते. तसेच, कुटूंबाला देखील तिने याबाबत कल्पाना दिली होती. तिच्या एका मित्रासोबत ती गेली होती.

१२ जून दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटूंबाने शोध घेतला. पण, ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटूंबाने सिंहगड रोड पोलिसांत मिसींग दाखल केली होती. सिंहगड पोलिसांनी लागलीच तरुणीचा व त्या तरुणाचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान दर्शनासोबत गेलेला तरूण देखील बेपत्ता असल्याबाबत समोर आले. त्याच्या कुटूंबाने याबाबत वारजे माळवाडी पोलिसांत मिसींग दाखल केली. त्यानंतर या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला. १२ जूनच्या दुपारनंतर या दोघांचे मोबाईल बंद झाले होते. शेवटचे लोकेशन वेल्हा येथील आल्याने त्यानूसार पोलिसांकडून शोध सुरू होता.

दरम्यान, आज राजगड किल्ऱ्याच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरुणीचा  कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वेल्हा पोलिसांनी लागलीच धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान तरुणीचा मोबाईल ,इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटूंबाने धाव घेऊन तिची ओळख पटवली. यादरम्यान, प्राण्यांनी मृतदेहाशी छेडछाड केलेली असल्याचेही समोर आले.

तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र देखील बेपत्ता असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नेमक घडले काय, याबाबत पोलीस आता युद्धपातळीवर तपास करत आहेत. सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे.

सत्काराला आली अन् बेपत्ता झाली…!

दर्शना पवार सत्कारानिमित्त कोपरगाव येथून पुण्यात आली होती. स्पॉट लाईट अकादमीच्या वतीने तिचा सत्कार समारंभ होता. गणेश कला क्रिडा येथे तिचा ११ जून रोजी सत्कार समारंभ देखील थाटात पार पडला. दरम्यान, तिने क्लासवनची पोस्ट काढल्याने पवार कुटूंब आनंदी होते. पण, या दुर्दैवी घटनेने पवार कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच कोपरगावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title: The body of a girl who appeared third in the mpsc examination in the state was found nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2023 | 07:48 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
1

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र
2

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
3

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.