मुंबई : सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. दरम्यान आता या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. “त्यांनी मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीय, पण मला समोर येऊन बोला” असं आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
[read_also content=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर, आता एकनाथ शिंदेही पत्रकार परिषद घेणार https://www.navarashtra.com/maharashtra/after-cm-uddhav-thackeray-facebook-live-now-eknath-shinde-will-also-hold-press-conference-295811.html”]
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे थोड्याच वेळात मातोश्री (Matoshree) या बंगल्यावर पोहचणार असून, यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक (Shivsainik) जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आता हळूहळू शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर जमयाला सुरुवात झाली असून, शिवसैनिकांची गर्दी होत असून, शिवसैनिक जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत.
“उद्धव साहेब आगे बढो…हम तुम्हारें साथ है”…”एकनाथ शिंदे हाय.. हाय”, “शिवसेना जिंदाबाद”, “जय भवानी…जय शिवाजी”, “उद्धव साहेब आगे बढो…हम तुम्हारें साथ है…”अशा घोषणाबाजी शिवसैनिकांनी दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 41 आमदार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपण पज सोडायला तयार आहोत, असं म्हटल्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आहेत.