Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis:  मुंबईला जागतिक ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्राच्या वाटचालीत युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे (UWA) मुंबई कॅम्पस महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2026 | 08:16 PM
मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Follow Us
Follow Us:
  • मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात UWA बजावणार महत्त्वाची भूमिका
  • मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
  • शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
मुंबई : मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, यूडब्ल्यूएसारख्या ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठाने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा निर्णय आजच्या मुंबईची क्षमता आणि जागतिक स्तरावरील तिच्या वाढत्या महत्वाची साक्ष देणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी पुढील पिढीसाठी ती जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी मुंबईलगत विकसित होत असलेल्या ‘मुंबई 3.0’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इकोसिस्टम तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यास नवे दालन खुले झाले आहे. पूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागत होते; आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत असून त्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यूडब्ल्यूए, मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक वातावरणाबरोबरच देशातील प्रमुख वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान उद्योग, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांच्या परिसंस्थेशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि शैक्षणिक सहकार्य वाढावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट क्षमता आणि महाराष्ट्राकडे व्यापक प्रमाणात प्रतिभा व संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील ज्ञानाधिष्ठित भागीदारी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा एक मजबूत स्तंभ ठरू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यूडब्ल्यूए हे महाराष्ट्राच्या भविष्यदृष्टीतील विकासप्रवासाचे भागीदार बनले असून या भागीदारीच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक यांनी मुंबईतील यूडब्ल्यूए कॅम्पसचे उद्घाटन हे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि भारत, विशेषतः महाराष्ट्र यांच्यातील संबंधांमधील ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचे सांगितले. गेल्या ३० वर्षांपासून मुंबई ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील सहभागाचे प्रमुख केंद्र राहिली असून, शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि लोकसंपर्काच्या क्षेत्रात दोन्ही बाजूंमध्ये दृढ भागीदारी निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. यूडब्ल्यूएचा मुंबई कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, तसेच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर यांनी मुंबई आणि चेन्नई येथील कॅम्पससाठी सुमारे ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली असून भारत-ऑस्ट्रेलिया संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च शिक्षणातून ज्ञान, संधी आणि जागतिक स्तरावरील संलग्नता निर्माण करण्याच्या उद्देशाने यूडब्ल्यूए भारतातील नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूडब्ल्यूएच्या मुंबई कॅम्पससाठी गेल्या काही दिवसांपासून करण्यात आलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. विद्यापीठाने तीन भारतीय विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केल्याबद्दल स्वागत करताना, यामुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी होणारा परकीय चलनाचा खर्च वाचण्यास मदत होईल, तसेच विद्यापीठाच्या संशोधनकेंद्री कार्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांचे कॅम्पस ‘एज्युकेशन सिटी’मध्ये उभारले जात असून, भविष्यात तेथे सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Web Title: Uwa mumbai campus global knowledge hub cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
1

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
2

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?
3

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
4

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.