Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल जयसिंघानीच्या याचिकांचे निर्णय ठेवले राखून; उच्च न्यायालयाने आणि विशेष न्यायालयातील याचिकेचाही समावेश

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीप्रकरणी अटक करण्यात आलेला सट्टेबाज अनिल जयसिंघानी आणि त्याचा भाऊ निर्मल यांनी अटकेविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2023 | 09:32 PM
अनिल जयसिंघानीच्या याचिकांचे निर्णय ठेवले राखून; उच्च न्यायालयाने आणि विशेष न्यायालयातील याचिकेचाही समावेश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीप्रकरणी अटक करण्यात आलेला सट्टेबाज अनिल जयसिंघानी आणि त्याचा भाऊ निर्मल यांनी अटकेविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे जामीनाच्या अर्जावरील विशेष न्यायालयानेही दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे. तसेच जयसिंघानी यांचा ताबा मध्यप्रदेश पोलिसांकडे दिला आहे.

अमृता फडणवीसांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी २० मार्च रोजी अनिल आणि त्याची मुलगी अनिक्षा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. जयसिंघानी बंधुच्या याचिकेनुसार, गुजरात पोलिसांनी त्यांना १९ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजता गोध्रा येथून ताब्यात घेण्यात आले. अहमदाबाद येथे त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल असतानाही त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईला आणताना गुजरात येथील संबंधित दंडाधिकार्‍यांकडून त्यांची ट्रान्झिट कोठडी न मागता घेणे अपेक्षित होते. मात्र, मुंबई पोलिसांनी तसे न करता ताब्यात घेण्याच्या जवळपास ४० तासांनी सत्र न्यायालयात हजर केले.

कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर कायद्यानुसार २४ तासांत जवळील दंडाधिकारी न्यायालयात हजर करणे आवश्यक असते, याच नियमाची पुर्तता करण्यात आली नसल्याचा दावा जयसिंघानी यांच्यावतीने ऍड. मृगेंद्र सिंह यांनी न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर केला. तसेच जयसिंघानी यांना पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आले तेव्हा कुठेही २० मार्चचा उल्लेख नव्हता. म्हणजे १९ मार्च रोजी कोणतिही चौकशी न करता गुजरातमधून ताब्यात घेऊन मुंबईला आणले त्यानंतर चौकशी करून त्यांची जयसंघानी अशी ओळख पटल्यावर अटक करण्यात आली का? असा प्रश्न सिंह यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केला.

जयसिंघानीला २० मार्च रोजीच अटक करण्यात आली असून, त्याचा या खटल्यातील कटात सहभाग आहे. सायबर पोलीस त्याच्या मागावर होते. जयसिंघानीचे वकील पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करीत आहेत. मात्र, जयसिंघानी यांचा कटात कसा सहभाग नसल्याचा कुठलाही पुरावा सादर केला नसून याचिकेतही कुठेही खुलासा केलेला नाही असा युक्तिवाद महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केला. गोध्रा येथे अटक केल्यानंतर गोध्रा ते मुंबई ११ तास यायला लागले, अटक मेमोनुसार, जयसिंघानीला २० मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता अटक केली आणि त्यानंतर २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पोलीस कस्टडी कायद्यानुसार विशेष न्यायालयात हजर केले. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

जयसिंघानीला जामीन देणे धोकादायक

अनिल जयसिंघानी हा सराईत गुन्हेगारी वृत्तीचा असून अनेक गुन्हे दाखल असतांना त्याला जामीन देणे धोकादायक आहे. अनेक गुन्ह्यात फरार असतांनाही पोलिसांसमोर हजर न होण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रभावाचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गृहमंत्र्यांच्या पत्नीला व्हिडिओ पाठवलेला मोबाईल अजूनही ताब्यात नाही अशातच जयसिंघानी बाहेर राहिला तर प्रकरणाच्या तपासात अडचणी निर्माण करेल, असा दावा विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी करून जयसिंघानीच्या जामीन अर्जाला विरोध केला. तर जयसिंघानी तपासात संपूर्ण सहकार्य करायला तयार असून, पोलीस कोठडी आवश्यक ते सर्व पुरावे पोलिसांकडे असल्याचे जयसिंघानीचे वकील मनन संघई यांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेऊन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश दीपक आलमले यांनी आपला निकाल राखून ठेवला.

जयसिंघानाचा ताबा मध्य प्रदेश पोलिसांना

अनिल जयसिंघानीविरोधात गोवा आणि मध्य मध्य प्रदेशमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा ताबा देण्याची मागणी मध्यप्रदेश आणि गोवा पोलीसांकडून करण्यात आली. जयसिंघानीच्या ताब्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर केली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने जयसिंघानीचा ताबा मध्य प्रदेश पोलिसांना दिला.

Web Title: The decisions of anil jaisinghani petitions are set aside including petitions in high court and special courts nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2023 | 09:32 PM

Topics:  

  • Amruta Fadnavis
  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai High Court
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
3

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.