Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या 'कोल्हापूर गॅझेट'ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात विशेष शस्त्र पूजन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 02, 2025 | 12:09 PM
Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार'; खासदार शाहू महाराजांचा इशारा

Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार'; खासदार शाहू महाराजांचा इशारा

Follow Us
Follow Us:

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वेळोवेळी उपोषण-मोर्चे काढले जात आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र करण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या ‘कोल्हापूर गॅझेट’ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात विशेष शस्त्र पूजन करण्यात आले.

आता कायदेशीर लढा आणि भारतीय संविधान हातात घेऊनच मराठा आरक्षणावर सरकारला धारेवर धरावे लागेल, असे मत व्यक्त करून खासदार शाहू छत्रपती महाराजांनी मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईंचे रणशिंग फुंकले. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पोवार उपस्थित होते. भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे ‘शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, लेखणी आणि भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले.

दरम्यान, मराठा आरक्षण लढा आता वेगळ्या वळणावर पोहचला आहे. आरक्षणासाठी यापूर्वी अनेकवेळा प्रयत्न झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने हालचाल केली. मात्र, त्यातून काय मिळाले याचा अद्याप उलगडा होत नाही. खंडेनवमीच्या मुहूर्तावर कृती समितीने हा लढा हातात घेतला आहे, आता तो आणखी तीव्र करणार आहोत, असा इशारा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी दिला.

मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच

१८८१ साली ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारावर ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी हा ऐतिहासिक दस्तावेज अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा ठरू शकतो, असे मत यावेळी व्यक्त केले गेले.

 मराठा आरक्षण लढा आता वेगळ्या वळणावर पोहोचणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढा सुरू असतानाच, कोल्हापूर गॅझेटच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाच्या आंदोलनाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. जरांगे पाटील आणि खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या एकसंघ आंदोलनामुळे मराठा आरक्षण लढा आता वेगळ्या वळणावर पोहचणार हे मात्र नक्की.

Web Title: The fight for maratha reservation will intensify warning of mp shahu maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Maratha Arakshan
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका
1

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
2

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.