Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. टेंडर आणि कंत्राटांबाबतचे पुरावे ईडीला देणार असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Oct 07, 2026 | 05:21 PM
ajay baraskar on jarange patil

ajay baraskar on jarange patil

Follow Us
Follow Us:
  • ‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही तर टेंडर योद्धा’; अजय बारस्करांची टीका
  • कंत्राटांबाबत हजारो कोटींचे आरोप; ‘कागदपत्रे ईडीला देणार’ असा बारस्करांचा दावा
  • राधाकृष्ण विखे पाटील, किशोर बलांडे आणि अन्य व्यक्तींवरही गंभीर आरोप
 

मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अजय बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर कंत्राटांपासून ते आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक आरोप केले. या आरोपांच्या समर्थनार्थ आपल्याकडे कागदपत्रे असल्याचा दावा करत ती ईडीकडे देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना ‘मनोज जरांगे आता संघर्ष योद्धा राहिलेला नाही, तर टेंडर योद्धा बनला आहे’, असा दावा केला. जरांगे यांच्या जवळच्या व्यक्तींच्या माध्यमातून कंत्राटांचं नेटवर्क उभं करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘कंत्राटांसाठी सिंडिकेट तयार केलं’

किशोर बलांडे, संजय कटारे, हेमंत उर्फ हणमंत धुमाळ यांच्यासह काही व्यक्तींची नावं घेत बारस्कर यांनी कंत्राटांबाबत गंभीर आरोप केले. हजारो कोटी रुपयांच्या निविदांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला.

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

काही कामांची गरज नसतानाही त्यांची यादी तयार करून प्रशासकीय मान्यता घेण्यात आली, अंदाजपत्रक वाढवण्यात आलं आणि त्यानंतर मोठ्या निविदा काढून त्या मॅनेज करण्यात आल्याचा आरोप बारस्कर यांनी केला.

‘माणिक इन्फ्रास्ट्रक्चरला 635 कोटींचं काम’

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून माणिक इन्फ्रास्ट्रक्चरला 635 कोटी रुपयांचं काम देण्यात आल्याचा दावा बारस्कर यांनी केला. कमी दरात काम करण्यास तयार असलेल्या कंपन्यांना बाजूला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसंच, संबंधित कंपनीला मोठ्या प्रमाणात कामं कशी मिळाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या कथित व्यवहारांबाबतची कागदपत्रे ईडीकडे सादर करणार असल्याचं बारस्कर यांनी स्पष्ट केलं.

‘ईडीला सगळी माहिती देणार’

पत्रकार परिषदेत बारस्कर यांनी मनोज जरांगे, किशोर बलांडे आणि इतर काही व्यक्तींमध्ये आर्थिक आणि कंत्राटी संबंध असल्याचे आरोप केले. जरांगे यांच्याकडे असलेल्या काही गाड्यांचा संबंध किशोर बलांडे यांच्याशी असल्याचाही त्यांनी दावा केला.

याशिवाय मनोज जरांगे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करत बारस्कर यांनी त्यांच्या संपत्ती आणि व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित केले. ‘माझ्याकडे कागदपत्रे आहेत आणि मी ती ईडीला देणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर लोक काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Web Title: Ajay baraskar serious allegations against manoj jarange patil tender contract ed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Enforcement Directorate
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Radhakrishna Vikhe Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.