Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

महाराष्ट्रातील उत्पादित होणाऱ्या फळे, भाजीपाला आणि इतर शेतमालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी जागतिक स्पर्धेत टिकेल अशी पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 19, 2025 | 07:30 PM
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका – भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत डाळिंबाचा पहिला कंटेनर रवाना होणे हे भारताची विश्वासार्हता, गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगततेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.

पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील

पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उत्पादित होणाऱ्या फळे, भाजीपाला आणि इतर शेतमालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी जागतिक स्पर्धेत टिकेल अशी पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आंबे, डाळिंब इतर फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक मूल्य मिळावे, यासाठी राज्य शासन, कृषी पणन मंडळ आणि केंद्र शासन प्रयत्नशील आहे. अमेरिकेसाठी जेएनपीटी बंदरातून हंगामातील पहिला डाळिंब कंटेनर रवाना होणे हे राज्याच्या कृषी-निर्यात क्षमतेसाठी तसेच शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. येणाऱ्या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या क्षमतेने डाळिंब निर्यात केले जाणार आहेत.

“लवकरच ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाचे काम सुरु होणार…”, रेल्वेमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी केली चर्चा

भारतीय डाळिंबांचा अमेरिकन बाजारपेठेतील वाटा वाढल्यास राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचेही पणन मंत्री रावल यांनी नमूद केले. यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा, एनपीपीओ व निर्यातदार अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सातत्याने तांत्रिक व धोरणात्मक पातळीवर कार्यरत आहेत.

डाळिंबाची प्रतवारी व प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार

2017-18 मध्ये काही तांत्रिक कारणामुळे अमेरिकेला भारतातून डाळिंब निर्यात बंद झाली होती. परिणामी जवळपास सहा वर्षे भारतीय डाळिंब अमेरिकन बाजारपेठेत पोहोचू शकला नव्हता. निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या अपेडा व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी (यू.एस.डी.ए.) तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर सातत्याने चर्चा करून कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर आवश्यक चाचण्या घेऊन अहवाल सादर केले. पॅक-हाऊसमध्ये डाळिंबाची प्रतवारी व प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली. त्यानंतर यू.एस.डी.ए. व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर विकिरण प्रक्रिया पार पाडण्यात आली. 4,800 बॉक्सेसमधून 17,616 किलो (सुमारे 17.6 मेट्रिक टन) डाळिंब निर्यात करण्यात आली आहे.

सन 2024 मध्ये अमेरिकेने निर्यातीसाठी काही शास्त्रीय निकष लागू केले आहेत. यामध्ये माईट वॉश प्रोटोकॉल, सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण तसेच वॉशिंग व ड्रायिंग प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच डाळिंबाचे चार किलो क्षमतेच्या प्रमाणित बॉक्समध्ये पॅकेजिंग करून अधिकृत विकिरण सुविधा केंद्रात विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रिया यूएसडीए व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणी व मान्यतेनंतरच पूर्ण केल्या गेल्या आहेत.

300 मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन

कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी यावेळी चालू 2025-26 हंगामात अमेरिकेस सुमारे 300 मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. अमेरिकेतील बाजारपेठेत डाळिंबाची मागणी झपाट्याने वाढत असून, तेथील डाळिंब बाजारपेठ सध्या अंदाजे 1.2 ते 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. विशेषतः भारतीय ‘भगवा’ व ‘सुपर भगवा’ जातींना चव, रंग व साखर-आम्ल संतुलनामुळे अधिक मागणी आहे.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले

Web Title: The first container of this season pomegranates has been shipped to the usa via sea from vashi facility center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
1

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
2

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र ‘पॉवरहाऊस’, पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा
4

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र ‘पॉवरहाऊस’, पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.