Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजी भिडेंवर सरकारने कारवाई करावी, सभागृहात आजच निवेदन करा, विरोधकांची मागणी तर मुख्यमंत्री…

आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल. तर सरकारने याची गंभीर दखल घेऊन भिडेंवर कारवाई करावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 28, 2023 | 03:01 PM
संभाजी भिडेंवर सरकारने कारवाई करावी, सभागृहात आजच निवेदन करा, विरोधकांची मागणी तर मुख्यमंत्री…
Follow Us
Follow Us:

मुंबई : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टिका-टिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने  (Government) त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मागमी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न…

दरम्यान, संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. थोरात म्हणाले, पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे.

महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल. तर सरकारने याची गंभीर दखल घेऊन भिडेंवर कारवाई करावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

विरोधकांच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी.” तर, “याची नोंदी घेतली आहे. चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Web Title: The government should take action on sambhaji bhide make a statement in the house today the opposition demands that the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2023 | 02:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.