Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी लांबणीवर पडणार? SIT ला राज्य शासनाकडून मुदतवाढ मिळण्याची चिन्हे

शालार्थ प्रणालीतील गैरव्यवहाराची चौकशी करून सादरीकरणासाठी अहवाल 'एसआयटी'ला आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे या पथकाला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 01:47 PM
माजी शिक्षणाधिकाऱ्यास बेड्या; बनावट शालार्थ आयडीप्रकरणी एसआयटीकडून कारवाई

माजी शिक्षणाधिकाऱ्यास बेड्या; बनावट शालार्थ आयडीप्रकरणी एसआयटीकडून कारवाई

Follow Us
Follow Us:

मुंबई : शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यभर चर्चा सुरु आहे. या घोटाळ्याची चौकशी लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. अपात्र नियमबाह्यरित्या शालार्थ प्रणालीत समाविष्ट केल्याच्या प्रकारासह अन्य संबंधित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाने ऑगस्टमध्ये ‘विशेष चौकशी पथक’ (एसआयटी) नेमले आहे. मात्र, या पथकामार्फत करण्यात येणारी चौकशी अद्यापही सुरू आहे.

शालार्थ प्रणालीतील गैरव्यवहाराची चौकशी करून सादरीकरणासाठी अहवाल ‘एसआयटी’ला आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे या पथकाला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘शालार्थ आयडी’साठी लाच घेताना एका शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर आता शिक्षण विभागाने शालार्थ आयडी घोटाळ्यातील चौकशीसाठी ऑगस्टमध्ये नेमलेल्या ‘एसआयटी’च्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेदेखील वाचा : शालार्थ आयडी घोटाळा ठरतोय अडचणीचा; ACB च्या रडारवर आता शिक्षण विभाग, अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणार चौकशी

दरम्यान, राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन दिल्यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी, संघटना आणि तक्रारदार नागरिक यांच्याकडून सरकारकडे तक्रारी आल्या होत्या.

अनेक ठिकाणांहून आल्या तक्रारी

लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, बीड येथे गैरप्रकार आढळून आल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑगस्टच्या सुरुवातीला ‘विशेष चौकशी पथक’ (एसआयटी) नेमण्यात आले. पथकाला चौकशीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या तीन महिन्यांच्या आत पथकाने चौकशी अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र, पथकाची अद्याप चौकशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या पथकाला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.

राज्यभरातून दोनशेंवर तक्रारी

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यता यासंदर्भात जवळपास २०० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी विशेष पथकामार्फत सुरू आहे. या चौकशीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पथकाला देण्यात आले आहे. चौकशीचे काम अद्यापही सुरू आहे. पथकाचा अहवाल सादर झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

Web Title: The investigation into the shalarth id scam may be delayed know reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • education news
  • Education Sector
  • Shalarth ID

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
2

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
3

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी
4

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.