Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्या विजयाचा निर्धार

 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा पार पडला. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची ही संधी आहे, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2026 | 12:59 PM
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी; जयंत पाटील यांचे एकजुटीने प्रचाराचे आवाहन

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी; जयंत पाटील यांचे एकजुटीने प्रचाराचे आवाहन

Follow Us
Follow Us:

सांगली : महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेऊन संघटितपणे प्रचार करावा. त्याचप्रमाणे पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची ही संधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जयंत पाटील यांनी केले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा पार पडला.

 

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पदवीधरांच्या अस्वस्थतेला आणि प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. हर्षदा देशमुख-जाधव या लोकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, तर जयंत आसगावकर यांनी विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न नेहमीच प्रभावीपणे मांडले आहेत.

काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व अस्वस्थतेचा संदर्भ देत परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत, शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर आणि विकासाच्या बाबतीत कोणत्याही भागावर दुजाभाव न करता समान न्याय देण्याची गरज व्यक्त केली.

हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, आजची झेन-झी आणि येणारी नवीन पिढी अधिक जागरूक आहे. त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भवितव्याचे प्रश्न वेळीच न सोडवल्यास ही पिढी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पदवीधर आणि शिक्षकांना सक्षम करणे हाच महाविकास आघाडीचा मानस आहे.

हे सुद्धा वाचा : ज्ञानेशकुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मोदी अन् शाहांनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

सांगली हे माझे आजोळ ; नातीला, भाचीला आशीर्वाद द्या : हर्षदा देशमुख-जाधव

“ग्रामीण आणि शहरी भागाची सांगड घालण्याचे बाळकडू मला सांगलीतूनच मिळालेले आहे. माझे आजोळ सांगली जिल्ह्यातील लेंगरे असून माझे बालपण याच मातीत गेले आहे. त्यामुळे मी सांगलीची नात व भाची आहे. आपल्या या नातीला आणि भाचीला तुमचा आशीर्वाद द्या,” असे भावनिक आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मेळाव्यात केले.

Web Title: The maha vikas aghadi has launched a vigorous campaign for the pune graduate and teachers constituency elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Election News
  • jayant patil
  • Mahavikas aaghadi

संबंधित बातम्या

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
1

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
2

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.