Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Mahamandal : एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार, प्रताप सरनाईक यांची घोषणा

राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एसटी बसेसची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 10, 2025 | 06:24 PM
एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार, प्रताप सरनाईक यांची घोषणा

एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार, प्रताप सरनाईक यांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:
  • एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार
  • शासनाने बस खरेदीचा निर्णय घेतला आहे
  • २५ हजार बसेस खरेदी करण्यात येणार
 

नागपूर : एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे. राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एसटी बसेसची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी विधान परिषदेत या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री सरनाईक यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय,भाई जगताप, अनिल परब, प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, राज्यात बससेवेची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. तीन हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पाच हजार बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच येत्या पाच वर्षात टप्प्या टप्प्यात २५ हजार बसेस खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

St Bus : एसटी महामंडळात होणार मोठे बदल, ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती

राज्य शासन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. महामंडळाच्या कामगारांची देय असलेले देणी देण्यास निधीची कमतरता भासणार असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले, एस टी महामंडळाच्या कामगारांची देय असलेली ४ हजार १९० कोटी इतकी रक्कम देण्यात येत आहे. यासाठी निधीची पुरवणी मागण्यांमध्ये मागणी करण्यात आली आहे. यामुळे कामगारांची थकबाकी येत्या सहा ते आठ महिन्यांत कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर एसटी महामंडळाचे बस डेपो व जागा विकसित करण्यात येणार आहेत. याच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही वापरण्यात येईल. एसटी महामंडळांचे उत्पन वाढविण्यासाठी अनेक स्रोत निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परिवहन विभागाने हळूहळू डिझेल बसेस हटवून पर्यावरणपूरक पर्यायी बसचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ST Mahamandal : एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये वाचणार! नेमका काय .

Web Title: The msrtc st corporation will purchase eight thousand new buses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus
  • st mahamandal

संबंधित बातम्या

“एसटी मधील ५००० चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर”, कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
1

“एसटी मधील ५००० चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर”, कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

MSRTC : “एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी पुकारलेला एल्गार!”, अनेक प्रलंबित मागण्यांचे मंत्र्यांना निवेदन
2

MSRTC : “एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी पुकारलेला एल्गार!”, अनेक प्रलंबित मागण्यांचे मंत्र्यांना निवेदन

Pratap Sarnaik : “हिंगणा बसस्थानकावरील अतिक्रमण तातडीने हटवा,” प्रताप सरनाईक यांचे निर्देश
3

Pratap Sarnaik : “हिंगणा बसस्थानकावरील अतिक्रमण तातडीने हटवा,” प्रताप सरनाईक यांचे निर्देश

हे तर आठवे आश्चर्य! ‘या’ बसस्टँडमध्ये रहस्यमयरित्या झिरपतेय पाणी; परिसरात दलदल अन्…
4

हे तर आठवे आश्चर्य! ‘या’ बसस्टँडमध्ये रहस्यमयरित्या झिरपतेय पाणी; परिसरात दलदल अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.