Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परभणीत ठाकरे गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

ओला दुष्काळ जाहीर करा, पिकविम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळावा व शेतीसाठी २४ तास वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मगाण्यांसाठी या धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावे, लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे. याबाबत आज परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने परभणीसह राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दानवे यांनी दिला.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 15, 2022 | 07:13 PM
परभणीत ठाकरे गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:

परभणी – परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Demons) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हाती मशाल घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करा, पिकविम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळावा व शेतीसाठी २४ तास वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मगाण्यांसाठी या धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावे, लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे. याबाबत आज परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने परभणीसह राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दानवे यांनी दिला.

[read_also content=”सरकारमधील वाचाळवीरांना आवरा, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/ajit-pawar-advice-to-shinde-fadnavis-beware-of-gossipers-ministers-in-the-government-345111.html”]

परभणी जिल्ह्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके जोमात आली मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने उर्वरित पिकेही खराब झालीत. यामुळे दुबार पेरणी करूनही नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असतानाही शासनाने अद्याप जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देखील दिला नाही. अनेक शेतकऱ्यांना तर मागील वर्षाचे अनुदानही मिळालेले नाही. जिल्ह्यातील ५०% शेतकऱ्यांचे विम्याचे दावे देखील विमा कंपन्या मार्फत फेटाळले गेले. यावर्षी जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शेतीसाठी सोडले जात नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात १६ तास विजेचे भार नियमन असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही.

पीक विमा भरतानाच ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून नोंदणी केलेली असताना सुद्धा त्यांना ऑनलाईन तक्रारी करा, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येते. सर्वच बाजूने शेतकरी भरडला जात असल्याची वास्तव त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडले. यावेळी आमदार व परभणी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रविंद्र वायकर, ज्योतिताई ठाकरे, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, विवेक नावंदर, सुधाकर खराटे, गंगाप्रसाद घुगे, सखुबाई लटपटे, अर्जुन सामाले, दिपक बारहाते, अंबिकताई डाके, राजू कापसे पाटील, संजय गाडगे, सुरेश बावकर. यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The parbhanit thackeray group morched on the collector office about farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2022 | 07:13 PM

Topics:  

  • Farmers Issues
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

WARDHA “८ वर्षांची मेहनत वाया! शेतकऱ्याचा संताप! १५० संत्रा झाडांची तोडली
1

WARDHA “८ वर्षांची मेहनत वाया! शेतकऱ्याचा संताप! १५० संत्रा झाडांची तोडली

Devendra Fadnavis : राज्यात कर्जमाफी कधी होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
2

Devendra Fadnavis : राज्यात कर्जमाफी कधी होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी
3

भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले…
4

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.