Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरातील वाहतूक सुधारली; 8 ठिकाणांवरची गर्दी झाली कमी

पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात केलेल्या उपाययोजना आणि त्यावर झालेला बदलानुसार शहरातील वाहतूक सुधारली असल्याचा दावा तर केला परंतु, गर्दीत अडकण्याच्या ठिकाणांमध्ये ८ ने घट झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 17, 2025 | 12:40 PM
पुणे शहरातील वाहतूक सुधारली; 8 ठिकाणांवरची गर्दी झाली कमी

पुणे शहरातील वाहतूक सुधारली; 8 ठिकाणांवरची गर्दी झाली कमी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : देशभरात पुणे वाहतूक कोंडीत चौथ्या स्थानावर असल्याचा दावा ‘टॉमटॉम’ संस्थेने अहवालात केल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात केलेल्या उपाययोजना आणि त्यावर झालेला बदलानुसार शहरातील वाहतूक सुधारली असल्याचा दावा तर केला परंतु, गर्दीत अडकण्याच्या ठिकाणांमध्ये ८ ने घट झाली आहे. त्यासोबतच सोलापूर-पुणे रस्त्यावर वाहन संख्येत वाढ होऊन देखील तेथील कोंडी सुरळीत असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात आणखी आवश्यक त्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत होईल, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. परिणामी शहरात पावसाळ्यात देखील यंदा वाहतूक कोंडीच्या नावाने बोंबा-बोंब झाली नाही.

‘टॉमटॉम’ या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या आणि देशात तिसर्‍या स्थानावर असल्याचे म्हटले. या संदर्भात पुणे पोलिसांनी शहरातील वाहतूकीबाबत नुकतीच माहिती दिली आहे. शहरात मेट्रो, उड्डाणपुल आणि इतर विकासकामे सुरू आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यास सप्टेंबरपासून महापालिका व वाहतूक पोलीस समन्वयातून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करत आहेत. शहरातील ८० टक्के वाहतूक ही प्रमुख ३२ रस्त्यांवरून होते. या प्रमुख रस्त्यांवर सुधारणा करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्यानुसार प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी कमी करणे यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करण्यात येत आहेत.

खराब रस्ते, खड्ड्यांची दुरुस्ती, अतिक्रमण व नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ‘मिशन-१५’ मोहिमेत १५ रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यात सोलापूर रस्त्यावर चांगला परिणाम दिसून येत आहे. लवकरच नगर रस्त्यासह इतर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. वर्षभरात ११० तास लागत होते, आता १०८ तास लागत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहरातील वाहतुक कोंडीत अडकण्याची ठिकाणे २०२३ च्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सरासरी ३७ होती. त्यात २०२४ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ८ ठिकाणांनी घट होऊन ती ठिकाणे २९ वर आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात २०१८ मध्ये वाहनांची संख्या ५२ लाख होती. ती गेल्या ५ वर्षांत ७२ लाख इतकी झाली. मागील पाच वर्षांत सुमारे २० लाख वाहने वाढली असून, रस्त्यांची वहन क्षमता तेवढीच आहे. तथापि महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत सुधारणा होत आहे. महापालिका आणि वाहतूक शाखेच्या प्रयत्नांतून पुढील वर्षभरात वाहतूक कोंडी आणखी कमी होईल.

वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला चौक, गोळीबार मैदान, वैदवाडी, सोपानबाग आणि रवीदर्शन चौक या महत्त्वाच्या चौकातील वाहतुकीत बदल केला. चौक अपवाद वगळता सिग्नल मुक्त झाले असल्याने येथील बहुतांशी कोंडी सुटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येते. सोलापूर रस्त्यावरून दरदिवशी सरासरी दीड लाख वाहनांची वाहतूक होते.

हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांची दहशत; येरवड्यात एकाला चाकूच्या धाकाने लुटले

वाहतूक पोलिसांनी प्रत्येक चौकातून ये-जा केलेल्या वाहनांची स्वतंत्र नोंद ठेवली त्यामध्ये सोपानबाग आणि रवीदर्शन चौकातील वाहने सर्वाधिक वाढल्याचे दिसून आले. सोपानबाग येथून ऑगस्ट महिन्यात ३२ लाख १७ हजार ७२६ वाहने गेली होती. तर, डिसेंबरमध्ये ५४ लाख ९४ हजार २०३ वाहने सोपानबाग येथून मार्गस्थ झाली होती. त्यानंतर रवीदर्शन चौकातील वाहनांत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये रवीदर्शन चौकातून १५ लाख ३८ हजार ९५५ वाहनांची वाहतूक झाली होती. डिसेंबरमध्ये तेथेच २९ लाख ९० हजार १२३ वाहने मार्गस्थ झाली.

Web Title: The police has claimed that the traffic in pune city is smooth nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Petrol Pump Strike: पुणेकरांनो पेट्रोल घ्या भरुन! संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद, नेमकं कारण काय?
1

Pune Petrol Pump Strike: पुणेकरांनो पेट्रोल घ्या भरुन! संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद, नेमकं कारण काय?

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश
2

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
3

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
4

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.