Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलावांच्या जिल्ह्यातील तलावच मोजताहेत अखेरच्या घटका, अतिक्रमणाच्या विळख्याला पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष    

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्याकाळात मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून मोठ्या काबाडकष्टाने तलावांची निर्मिती केली होती.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 27, 2022 | 05:56 PM
The ponds in the ponds district are the last factor to be counted, the Irrigation Department ignores the problem of encroachment

The ponds in the ponds district are the last factor to be counted, the Irrigation Department ignores the problem of encroachment

Follow Us
Close
Follow Us:

अर्जुनी मोरगाव : भंडारा जिल्ह्यातून (Bhandara District) विभाजन १ मे १९९९ ला होऊन गोंदिया जिल्ह्याची (Gondia District) निर्मिती झाली. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा (District of Lake) म्हणून ओळखले जातात. गोंदिया जिल्ह्यात अनेक तलाव आहेत. मात्र, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील (Arjuni Morgaon Taluka) अनेक तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. तलाव अतिक्रमणामुळे नामशेष होत आहेत. मात्र, संबंधित विभाग या तलावांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करत आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्याकाळात मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून व शेतातून मोती पिकवून आपले उदरनिर्वाह होईल, या आशेने मोठ्या काबाडकष्टाने तलावांची निर्मिती केली. तालुक्यात प्रत्येक गावात तलाव आहेत. मात्र १९७१ मध्ये तालुक्यातील नदीला अडवून इटियाडोह धरण (Etiadoh Dam) अस्तित्वात आले. त्यामुळे बऱ्याच गावांना तसेच नवेगावबांध जलाशयाने अनेक गावात शेतीला सिंचन झाल्याने या तलावांकडे जनतेने दुर्लक्ष केले.

गावा-गावातील अनेक तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रफळ कमी होऊन अगदी अल्प तलावांमध्ये पाणी साठवणूक केली जाते. तलावांचे क्षेत्रफळ कमी झाल्याने तलावांची  पाणी साठवणूक क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळेसुद्धा जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होऊन पाण्याची पातळी खोल जात आहे. निर्माण केलेले व जतन करून ठेवलेले तलाव आज नामशेष होत आहेत. काही दिवसापूर्वी तहसीलदारांनी तलाठी आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तलावांची संपूर्ण माहिती मागविली. त्यामुळे तलावांचे पुनर्जीवन होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: The ponds district are the last factor to be counted the irrigation department ignores the problem of encroachment nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 05:56 PM

Topics:  

  • Gondia District
  • gondia news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.