
मंगळवेढ्यात नक्की काय घडलं (फोटो सौजन्य - iStock)
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 19 तर सदस्य पदासाठी 160 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सदस्य पदाचे 20 अर्ज नामंजूर करण्यात आले.138 अर्ज मंजूर करण्यात आले तर दोन सदस्याचा हरकतीवर निकाल राखून ठेवला असून त्या अर्जाची छाननी निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाराखाली सुरू करण्यात आली.
नक्की काय घडले
नगराध्यक्ष पदाच्या स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा अवताडे यांच्या मुलांचे सध्या नगरपालिकेत दोन कामे सुरू आहेत त्यामुळे भविष्यात या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार झाल्यानंतर सदर पदावरील व्यक्ती त्यावर कठोर भूमिका घेऊ शकतील का? याबाबत प्रश्नचिन्ह असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्दबातल करावा असा युक्तवाद विरोधकाकडून करण्यात आला तर भाजपच्या उमेदवार सुप्रिया जगताप या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत शिवाय अपत्यावरून अर्ज रद्द करावा असा युक्तिवाद विरोधी गटाकडून करण्यात आला.
त्यावर जगताप यांच्या वकिलाने मंगळवेढ्यात न्यू इंग्लिश स्कूल नावाची कोणतीही संस्था अस्तित्वात नाही त्यामुळे तो मुद्दा लागू होत नाही शिवाय त्यांनी त्या नोकरीचा दिलेला राजीनामा संस्थेने मंजूर केला. याशिवाय अपत्याबाबतचा कोणताही सबळ पुरावा विरोधकाकडे नसून केवळ फोटोवरून आपत्याचा मुद्दा ठरवता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावर निवडणूक आधिकार्यांनी रात्री उशिरा आठ वाजेपर्यंत कोणताही निकाल दिला नव्हता त्यामुळे निकाल काय लागणार याची उत्सुकता लागली आहे. याशिवाय प्रभाग सहा मधील भाजपच्या उमेदवार अर्जातील त्रुटीमुळे रागिनी कांबळे यांचा अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरला तर तेजस्विनी कदम व आशा जगताप यांच्या भाजप चिन्हावरील तर क्रांती दत्तू (शिवसेना उबाठा) तर सुवर्णा चळेकर (काॅग्रेस) यांचा अर्जाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्यामुळे रद्द झाला त्यामुळे त्यांनी अपक्ष भरलेले अर्ज रिंगणात आहेत. सदस्याच्या अर्जामध्ये प्रभाग प्रभाग निहाय अपात्र अर्ज पुढील प्रमाणे आहेत.
मंगळवेढा तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड, 18 जणांवर गुन्हा दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोण आहे रिंगणात?
नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी कोंडूभैरी (राष्ट्रवादी श.प), तर अपक्ष म्हणून तेजस्विनी कदम, माधवी किल्लेदार, क्रांती दत्तू,अरुणा माळी, सुवर्णा चेळेकर.राजामती कोंडुभैरी, माधुरी कट्टे, संगीता कट्टे, राजश्री चेळेकर, हे रिंगणात आहे.तर सुप्रिया जगताप (भाजप),सुनंदा अवताडे,प्रणाली अवताडे, अर्जावरील हरकतीमुळे निकाल राखून ठेवला,रात्री उशिरापर्यत निकाल न दिल्यामुळे कामकाज यंत्रणा खूपच ढीली आसल्याने नागरीकामधून तिव्र संताप व्यक्त हाेत आहे.
कार्यालयाला न्यायालयाचे स्वरूप
नगराध्यक्षपदाच्या अर्जावरील हरकतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारीच्या दालनात तालुक्यातील वकिलाची फौज मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाला न्यायालयाचे स्वरूप आले.
अर्जाच्या छाननी नंतर माध्यमांना नगराध्यक्ष पदावरील तीन अर्जातील न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता बाकीची माहिती देण्यासाठी तब्बल साडे आठ वाजताही प्रतीक्षा करावी लागली. सदस्य पदासाठी कोणते अर्ज कोणत्या कारणास्तव बाद झाले याची माहिती देखील देण्यात आली नाही या प्रक्रियेसाठी मनुष्यबळ कमी असल्याचा शक्यता असल्यामुळे येणाऱ्या काळात निवडणूक प्रक्रियेला जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करावे व नागरिकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेविषयी निर्माण होणारा संभ्रम दूर करावा अशी मागणी या निमित्ताने समोर आली.
Local Body Election: राजकारण तापणार! मंगळवेढ्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटात सामना