Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; ‘हा’ पर्यायी वर्तुळाकार मार्ग ठरणार फायद्याचा

गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road Traffic) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन पर्यायी वर्तुळाकर पर्यायी मार्ग (Optional Rout) उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2023 | 08:39 PM
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; ‘हा’ पर्यायी वर्तुळाकार मार्ग ठरणार फायद्याचा
Follow Us
Follow Us:

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road Traffic) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन पर्यायी वर्तुळाकर पर्यायी मार्ग (Optional Rout) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विद्यापीठ चौकातून (University Chowk) ओैंधकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (आचार्य आनंदऋषीजी चौक), बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्ता, पाषाण रस्ता, सेनापती बापट रस्ता तसेच अन्य मार्गांवर वाहतूक बदल प्रस्तावित आहेत. वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) या संस्थेतील अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली.

बाणेर रस्ता, ओैंध रस्त्याने विद्यापीठ चाकात येणारी वाहने विनासिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या मार्गिकेने सोडण्यात येणार आहे. विद्यापीठ चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी यापूर्वी कॉसमॉस बँक येथे वळण्याची परवानगी (यू टर्न) दिली होती.

नवीन वाहतूक बदलानुसार कॉसमॉस बँकेजवळील वळण बंद करुन सेनापती बापट रस्ता चौकातून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणारी वाहतूक सेनापती बापट रस्ता चौकातून डावीकडे वळवून पाषाण रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

गणेशखिंड रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे जाण्यासाठी प्रस्तावित असलेले तीन वर्तुळाकार मार्ग पुढीलप्रमाणे –

वर्तुळाकार मार्ग – गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ, चतु:शृंगी पोलीस ठाणे, केंद्रीय विद्यालय, पाषाण रस्ता, सिंहगड गेट (पुणे ग्रामीण मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने ओैंध किंवा उजवीकडे वळून विद्यापीठ चौकातून वळून पुन्हा ओैंध.

वर्तुळाकार मार्ग – पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता चौकातून ओैंध किंवा उजवीकडे वळून विद्यापीठ चौकातून ओैंध.वर्तुळाकार मार्ग तीन- गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता चौकमार्गे उजवीकडे वळून सर्जा हॉटेल चौकमार्गे ओैंध

पिंपरी-चिंचवड शहराकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी मार्ग– ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज रस्ता, डॉ. आंबेडकर चौक, साई चौक, खडकी रेल्वे स्थानक, भुयारी मार्ग, चर्च चौक, जुना मुंबई-पुणे रस्ता.

पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क भागातून ओैधकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा- अभियांत्रिकी महाविद्यालय उड्डाणपूल, वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौक, खडकी पोलीस ठाणे, जे टाईप फुटबॉल मैदान, साई चौक, डॉ. आंबेडकर चौक, स्पायसर कॉलेज रस्ता, ब्रेमेन चौकमार्गे ओैंध

Web Title: The problem of traffic jam on ganeshkhind road in pune will be solved alternate circular route nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2023 | 08:39 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Road Traffic

संबंधित बातम्या

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड
1

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
2

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

Pune Police Transfer: पुणे पोलिसांची जम्बो बदली यादी जाहीर: कोथरूड, फरासखानासह महत्त्वाच्या ठाण्यांचे अधिकारी बदलले
3

Pune Police Transfer: पुणे पोलिसांची जम्बो बदली यादी जाहीर: कोथरूड, फरासखानासह महत्त्वाच्या ठाण्यांचे अधिकारी बदलले

Pune illegal abortion racket: गर्भलिंग निदान; केडगाव परिसरात बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश; दोन वर्षात ५००हून अधिक प्रकारांची नोंद
4

Pune illegal abortion racket: गर्भलिंग निदान; केडगाव परिसरात बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश; दोन वर्षात ५००हून अधिक प्रकारांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.