Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीमध्ये नवीन पक्षाला घेताना घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात घेतले पाहिजे, रिपब्लिकन पक्षाची मागणी  

भाजपला आणि अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थन करणाऱ्या रिपब्लिकन  पक्षाला विश्वासात न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे याना महाविकास आघाडीतुन महायुती मध्ये घेतले आहे. याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.ज्यांनी महाविकास आघाडीत राहून महायुती वर टीकास्त्र सोडले आणि भीमशक्ती शिवशक्तीभाजपवर आसूड ओढण्याचे काम केले.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 11, 2023 | 08:31 PM
Ramdas Athawale

Ramdas Athawale

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – भाजप शिवसेनेची युती होती रिपब्लिकन पक्ष त्यात सामील झाल्यापासून युतीची महायुती झाली आहे.शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती ची हिम्मत कोणीही रिपब्लिकन नेता दाखवीत नसताना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन रिपब्लिकन  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रचंड राजकीय रिस्क घेऊन शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती यशस्वी करून दाखविली. भाजपला आणि अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थन करणाऱ्या रिपब्लिकन  पक्षाला विश्वासात न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे याना महाविकास आघाडीतुन महायुती मध्ये घेतले आहे. याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.ज्यांनी महाविकास आघाडीत राहून महायुती वर टीकास्त्र सोडले आणि भीमशक्ती शिवशक्तीभाजपवर आसूड ओढण्याचे काम केले. भाजप ला साथ देता म्हणून रिपब्लिकन पक्षावर जे टीकेचा आसूड ओढत होते त्यांना सोबत घेताना रिपब्लिकन पक्षाला विश्वासात का घेतले नाही.कवाडे गटावर विश्वास ठेवताना रिपब्लिकन पक्षाने महायुतीला विश्वासाने दिलेले योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना का  आठवले नाही असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी आज केला आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये कुणाला प्रवेश द्यावा किंवा त्यांच्या पक्षाने कुणाशी युती करावी हा त्यांचा अधिकार आहे.मात्र  महायुती मध्ये भाजप; बळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) हे तीन पक्ष घटक पक्ष आहेत. या पक्षांच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन नवीन पक्षाला महायुती चा घटक पक्ष करणे आवश्यक आहे.मात्र याबाबत कोणतेही मित्रपक्षाचे संकेत न पाळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पी आर पी ला महायुती मध्ये घेण्याचा केलेला प्रयत्न चुकीचा आहे. महायुती मधील विश्वासार्हता अभेद्य राहील याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पाहिजे असे मत रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी व्यक्त केले. 

महायुती मधील जोगेंद्र कवाडे यांच्या पी आर पी च्या प्रवेशाबाबत रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार आहे अशी माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

Web Title: The republican party demands that the leadership of the republican party be taken into account as a constituent party when taking a new party into the grand coalition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 08:00 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Marathi News
  • Ramdas Athawale
  • Republican Party

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.