Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुती सरकारच्या भूमिकेला न्‍यायालयाकडूनही शिक्‍कामोर्तब; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले आभार

महायुती सरकारने शेतक-यांच्‍या बाजुने घेतलेल्‍या भूमिकेवर न्‍यायालयानेही शिक्‍कामोर्तब केल्याने राज्याचे महसुह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्यायालयाचे आभार मानले आहे. महायुती सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाच्या संघर्षांला यश मिळाले आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले.

  • By नारायण परब
Updated On: Aug 14, 2024 | 09:57 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

श्रीरामपूर: तालुक्यातील  अकारी पडीत जमीनी शेतक-यांना पुन्‍हा देण्‍याबाबतचा महत्‍वपूर्ण निर्णय उच्‍च न्‍यायालयाने दिल्‍याने शेतक-यांना (Farmers) मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी अनेक वर्षे कराव्‍या लागलेल्‍या शेतक-यांच्‍या संघर्षाला यश मिळाले असून, महायुती सरकारने शेतक-यांच्‍या बाजुने घेतलेल्‍या भूमिकेवर न्‍यायालयानेही शिक्‍कामोर्तब केली असल्‍याची प्रतिक्रीया महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी व्‍यक्‍त केली.

अकारी पडीत जमीनींच्‍या संदर्भात प्रशासकीय आणि न्‍यायालय स्‍तरावर अनेक वर्षे प्रश्‍न प्रलंबित होता. तालुक्‍यातील सुमारे साडेसात हजार एकर जमीनींच्‍या संदर्भात असलेल्‍या प्रश्‍नाच्‍या बाबत शेतक-यांना (Farmers) अनेक वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. राज्‍यात महायुतीचे सरकार आल्‍यानंतर खंडकरी शेतकऱ्यांप्रमाणेच अकारी पडीत जमीनींच्‍या संदर्भात सुध्‍दा तातडीने निर्णय होण्‍याकरीता महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी मंत्रालयात सातत्‍याने बैठका घेवून शेतक-यांच्‍या हिताच्‍या दृष्टीने निर्णय होईल अशी भूमिका घेतली होती. संभाजीनगर (Sambhajinagar) उच्‍च न्यायालयात याबाबत दाखल झालेल्‍या याचिकेमध्‍ये सुध्‍दा सरकारने प्रभावी बाजू मांडून शेतक-यांना न्‍याय कसा मिळेल अशी भूमिका घेतली.

आज न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्णयाचे स्‍वागत करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, शंभर वर्षांहून अधिक काळ चाललेल्‍या या शेतक-यांच्‍या संघर्षाला ख-या अर्थाने मोठे यश मिळाले आहे. यामध्‍ये महायुती  सरकारची भूमिका ही महत्‍वपूर्ण ठरली. यापुर्वी लोकनेते स्‍व.बाळासाहेब विखे पाटील  यांनी अकारी पडीत जमीन मालकांच्‍या हक्‍कासाठी प्रयत्‍न केले होते. मात्र त्‍या त्‍या वेळच्‍या सरकारला शेतक-यांची संवेदनशिलता समजली नाही. यापुर्वीही जिल्‍ह्याला (Ahmednagar) महसूल मंत्रीपद होते त्‍यांनी तर, शेतक-यांना जमीनी देता येणार नाहीत हीच भूमिका घेतली होती. मात्र दुसरीकडे त्‍या जमीनी कराराने देण्‍याच्‍या हालचाली सुरु केल्‍या होत्‍या. मात्र राज्‍यात महायुतीचे सरकार असल्‍यानंतर महामंडळाच्‍या आधिकायांसमवेत तसेच वकीलांसमवेत बैठका घेवून या जमीनी  शेतक-यांना पुन्‍हा कराव्‍या लागतील अशीच बाजू आपण सातत्‍याने घेतली. याकडे ना.विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

राज्‍यात महायुती सरकार आल्‍यानंतर याबाबत वेळोवेळी मंत्रालय स्‍तरावर झालेल्‍या बैठका, न्‍यायालयीन लढाईत मांडली गेलेली सकारात्‍मक भूमिका या सर्वांचे यश हे आता शेतक-यांच्‍या बाजूने उभे राहीले आहे. तालुक्‍यातील सुमारे नऊ गावातील शेतक-यांना त्‍यांच्‍या जमीनी पुन्‍हा मिळण्‍याचा मार्ग मोकळा झाला असून, याबाबत आपण वेळोवळी शेतक-यांना आश्‍वासन देवून या जमीनी पुन्‍हा मिळवून देण्‍याची ग्‍वाही दिली होती. त्‍यावर आता न्‍यायालयाने (High court) सुध्‍दा शिक्‍कामोर्तब केल्‍याने शेतक-यांच्‍या या संघर्षात योगदान देता आल्‍याचे समाधान असल्‍याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली. न्‍यायालयाच्‍या निकालाची सविस्‍तर माहीती घेवून याबाबतची प्रशासकीय कार्यवाही लवकरच करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Web Title: The role of the mahayuti government has also been sealed by the court minister radhakrishna vikhe patil thanked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 09:55 PM

Topics:  

  • High court
  • maharashtra
  • radhakrushna vikhe patil

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.