Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजराई धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी; प्रतिबंधित क्षेत्रात तरुणांची घुसखोरी

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि नाले भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 20, 2025 | 05:44 PM
वजराई धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी; प्रतिबंधित क्षेत्रात तरुणांची घुसखोरी
Follow Us
Close
Follow Us:

Pune  News:  भारतातील सर्वात उंच वजराई धबधब्यावर पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून काही उत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून थेट धबधब्याच्या कड्यावर पोहोचत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. प्रशासनाने स्पष्टपणे बंदी घातलेल्या या भागात काही तरुण जुन्या पायवाटेने घनदाट जंगलातून जाऊन थेट धबधबा कोसळतो तिथपर्यंत पोहचत आहेत.
भांबवली गावाच्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाच्या सहकार्याने या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरच्या पायवाटेवर लाल दगड टाकून मजबूत मार्ग, बसण्यासाठी पॅगोडा आणि पायऱ्यांचा परिसर विकसित करण्यात आला आहे. मात्र, पायऱ्यांच्या शेवटी कुंपण घालून पुढील मार्ग बंद करण्यात आला आहे.तरीही काही तरुण जुनी पायवाट वापरून धोकादायक जंगलातून थेट धबधब्याजवळ जात आहेत. या भागात तीव्र उतार, खोल दऱ्या, विंचू, जळवा, जंगली प्राणी आणि दगड कोसळण्याचा धोका कायम आहे. यामुळे कोणताही अपघात घडल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो.

वनविभागाने प्रतिबंधित भागात जाणाऱ्यांवर ₹2000 दंडाची चेतावणी दिलेली असली तरी ती दुर्लक्षित केली जाते. काही वर्षांपूर्वी काही पर्यटक धबधब्याच्या नादात जंगलात हरवले होते, त्यांचा ठावठिकाणा दुसऱ्या दिवशी लागला होता. स्थानिक प्रशासन व व्यवस्थापन समितीने अनेकदा आवाहन करूनही काही पर्यटक या सूचना पाळत नाहीत. त्यामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

नदीपात्रात अंघोळ करणाऱ्या तरुणांना पोलिसांचा दणका

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि नाले भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही नागरिक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालतात.पुण्यात असाच प्रकार समोर आला असून, पावसाने तुडुंब भरलेल्या नदीपात्रात अंघोळ करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. या तरुणांना दिलेल्या शिक्षेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचा अंदाज कायम असून, नद्यांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी नदीपात्रात उतरणे, फोटोग्राफी किंवा अंघोळीसारख्या कृती टाळाव्यात, असे आवाहन केले आहे.

Web Title: The thrill of vajrai falls can be life threatening youth intrusion into restricted areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • pune news
  • Rain News

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
1

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
2

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
3

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
4

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.