Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार! स्वतंत्र सशुल्क वाहनतळ उभारणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

  • By Aparna
Updated On: Jun 20, 2023 | 05:24 PM
कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार! स्वतंत्र सशुल्क वाहनतळ उभारणार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांना“कॅरेज वे’मध्ये वाहने लावण्यास परवानगी द्यावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आणि पोलिसांना दिले. स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथील नो पार्किंगचे फलक काढण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच गरवारे महाविद्यालयाजवळ महापालिकेच्या मोकळ्या जागेत स्वतंत्र सशुल्क वाहनतळ उभारण्यासही पाटील यांनी सांगितले.

– तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा
वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली होती. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, हेमंत संभूस, विनिता ताटके, प्रियंका पिसे, रोहित गुजर, संतोष पाटील, केदार कोडोलीकर, आकाश बुगडे, राहुल वानखडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

-व्यावसायिकांची मागणी
कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटी दरम्यानचा रस्ता ६० फुटांचा असल्याने यापूर्वी दुतर्फा वाहने उभी करण्यास महापालिका आणि पोलिसांची परवानगी होती. या रस्त्यावर वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यापाठोपाठ नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलाचेही काम सुरू झाले. या दोन्ही प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावे, अशी तेथील व्यावसायिकांची मागणी केली होती.
कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वे उपलब्ध आहे, अशा भागांमध्ये वाहने पार्किंगला परवानगी द्यावी. तसेच, व्यावसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहणी करून नो पार्किंगचे फलक काढून, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांची समस्या सोडवावी, असे पाटील यांनी सांगितले. गरवारे महाविद्यालयाच्या विरुद्ध बाजूस महापालिकेच्या जागेवर वाहने पार्किंगसाठी सशुल्क वाहनतळ सुरू करावे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने व्यवस्था उभी करावी, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: The traffic jam on curve road will be solved a separate paid parking lot will be set up nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2023 | 05:24 PM

Topics:  

  • chandraknt patil
  • maharashtra
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?
1

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?
2

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन
3

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध
4

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.