Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कासचा पाणीसाठा साडेआठ फुटांवर !

सातारा शहराची तहान भागविणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2022 | 04:05 PM
कासचा पाणीसाठा साडेआठ फुटांवर !
Follow Us
Follow Us:

कास पठार / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सातारा शहराची तहान भागविणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे.

गतवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कासचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. सध्या मागील महिन्यापासुन जुना व्हॉल्व्ह ऑपरेट न करता सध्या नवीनलाईन सुरू केल्याने शेवटपर्यंतचा एकच नवीन व्हॉल्व्ह सुरू राहणार आहे.

सद्यस्थितीला तलावात केवळ साडेआठ फुट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साडेसात फुट पाणीसाठा तलावात शिल्लक होता. दोनवेळा झालेल्या अवकाळी पावसाने कास तलावाच्या पाणीपातळीत दोन ते तीन इंच वाढ झाली होती. परिसरात उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. वरूणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.

शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर  दिवसाला तलावातील पाणीपातळी सव्वा ते दिड इंचाने कमी होत आहे. तलावातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असून काही ठिकाणी पात्रातील जमिनी देखील उघडया पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणी पातळी खालावतच चालली आहे.

सध्या कास तलावात साडेआठ फुट पाणीसाठा शिल्लक असुन गतवर्षीच्या तुलनेत यंदा एका फुटाने पाणीसाठा जरी जास्त असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.

– जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव.

Web Title: The water level of kas is on 8 and half feet nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 04:05 PM

Topics:  

  • Kas Pathar
  • maharashtra

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.