Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली, महावितरणचा गलथान कारभार; नागरिक संतापले

महावितरण कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपीजवळ विजेचा जबर धक्का बसून चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील मुथरा हायस्कूल रिंग रोड, दातारमळा परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2025 | 12:22 PM
विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली, महावितरणचा गलथान कारभार; नागरिक संतापले

विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली, महावितरणचा गलथान कारभार; नागरिक संतापले

Follow Us
Close
Follow Us:
  • विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली,
  • महावितरणचा गलथान कारभार
  • नागरिक आणि लोकप्रतिनिधी संतापले

इचलकरंजी : महावितरण कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपीजवळ विजेचा जबर धक्का बसून चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील मुथरा हायस्कूल रिंग रोड, दातारमळा परिसरात घडली आहे. राधिका रमेश चव्हाण (वय ५, रा. अब्दूल लाट, ता. शिरोळ) असे या चिमुरडीचे नाव आहे. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की तिच्या हात-पायांवर भाजल्याच्या खोल जखमा झाल्या आहेत.

राधिका सुट्टीसाठी इचलकरंजी येथे मामाकडे आली होती. खेळताना ती परिसरातील उघड्या हाय व्होल्टेज डीपीच्या अगदी जवळ गेली होती. काही क्षणांतच तिला जोरदार विजेचा धक्का बसला. या भीषण घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन राधिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. राधिकाचे कुटुंब गरीब असून, वडील रमेश चव्हाण मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

उघड्यावरील डीपीचा गंभीर प्रश्न

महावितरणच्या गलथान व निष्काळजी कारभारामुळे एका गरीब मजुराच्या घरातील निष्पाप मुलगी आज आयुष्य आणि मृत्यूच्या सीमेवर आहे, हे शहरासाठी कलंकासमान असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. शहरातील इतर भागांतही उघड्या डीपी, कुंपणाचा अभाव आणि चेतावणी फलक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जखमी राधिकाच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत, योग्य नुकसान भरपाई आणि तिच्या उपचारांचा पूर्ण खर्च महावितरणकडून उचलला नाही, तर आम्ही आंदोलन करू असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

लेखी तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही नाही

या परिसरातील हाय व्होल्टेज डीपी बराच काळ उघडाच होता. झाकण गंजलेले, तारांची स्थिती निकृष्ट, आणि परिसरात कोणतेही सुरक्षा कुंपण नव्हते. अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी हा गंभीर अपघात घडला. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा संताप उसळला. महावितरणचे अधिकारी तब्बल दोन-अडीच तासांनी घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Web Title: There has been an incident where a small girl was electrocuted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Ichalkaranji
  • mahavitaran

संबंधित बातम्या

कोल्हापुरमध्ये मतदार आक्रमक, थेट मतदानावर टाकला बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?
1

कोल्हापुरमध्ये मतदार आक्रमक, थेट मतदानावर टाकला बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?

Ladki Bahin Yojana  : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…
2

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…

सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार? संजय जगताप यांना करावी लागणार कसरत
3

सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार? संजय जगताप यांना करावी लागणार कसरत

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…
4

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.