
lack of facilities and cleanliness in Dharangaon Rural Hospital Jalgaon
धरणगाव : ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसांपासून कर्मचारी कमी असून जनतेला त्रास होत आहे. या रुग्णालयाला एकूण ८९ गावे जोडलेली आहेत. यात ग्रामीण भागातून नागरिक येत असतात. हे तालुक्याच्या ठिकाणी असणारे एकच रुग्णालय (Hospital News) आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य कायम असते. रुग्णांच्या बेडशीट मळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. या ठिकाणी कर्मचारी कामाचा कामचुकार पण करताना दिसून येत असतो. वैद्यकीय अधिकारी देखील मन राजा मन प्रधान असे दिसून येत असल्यास एकच आहे रुग्णांना पाण्याची सुविधा शौचालय सुविधा तालुक्याचे रुग्णालय असून देखील सुविधा मिळत नाहीत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोणाला काही दुखापत झाली असेल तर जळगाव यावे लागते. मात्र आल्यानंतर देखील ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत असतो. विशेष म्हणजे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात वयाच्या दाखला मिळत असतो. धरणगाव ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे काम चोपडा रस्त्यालगत सुरू आहे. त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. परंतु ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी कामचुकारपणा करतात तर याचा काय उपयोग? असा उपजिल्हा रुग्णालयाबाबत देखील प्रश्न धरणगाव तालुक्यातील नागरिकांना मार्फत करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयाला कोणी वाली नाही का? कोणी बोलणारे नाही काय यांना असा प्रश्न उपस्थित होत आहे. यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे जळगाव
जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी किरण पाटील यांनी सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धरणगाव ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
धरणगाव शहरात उपजिल्हाय रुग्णालय मंजूर झालेले आहे. पण आता अस्तित्वात असलेले ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टर मंजूर असताना एक किंवा दोनच डॉक्टर असतात. बाह्य रुग्ण विभाग हा केवळ १२ वाजेपर्यंत चालू असतो आणि दिवसभर बंद राहतो त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. म्हणून उपजिल्हा रुग्णालय जरी होत असेल तरी सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात लक्ष दिले जात नाही, सुविधा नाहीत. यासंदर्भामध्ये आम्ही निवेदन व तक्रारी देखील केले आहे म्हणून अस्तित्वात असलेला रुग्णालयात आद्य सुविधा प्रेस कॅन्सर मशीन आणि डिजिटल एक्स-रे मशीन हे धरणगाव रुग्णालयात आले असता त्याचे उद्घाटन झालं परंतु एकही पेशंटची तपासणी किंवा निदान झाले नाही आणि हे मशिन येथून काढून पुन्हा दुसरीकडे शिफ्ट झाल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी सांगितले आहे.