स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आढावा घेतला (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Election : धरणगाव : नगरपालिकेसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्याची मुदत आज सोमवारी संपली असून, निवडणुकीची चर्चा चौकाचौकात, गल्लीबोळात रंगू लागली आहे. लीला सुरेश चौधरी (शिवसेना ठाकरे गट) आणि वैशाली विनय भावे (शिवसेना शिंदे गट) यांच्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगणार रंगणार आहे. प्रशासनातर्फे निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्णत्वाकडे जात आहे. प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी धरणगाव येथे भेट देऊन यापुर्वीच आढावा घेतला आहे.
असा असेल बंदोबस्त
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरामध्ये जोरदार वातावरण रंगले आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. याच पार्श्वभूमीवर जालनामध्ये जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. यासाठी चेक पोस्ट, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाण, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामकाजाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी भेट दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगराध्यक्षपदासाठी दोन्ही सेना लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप, शिंदेसेना व अजित पवार गट यांच्यात युती झाली असल्याने महाराष्ट्र जनविकास आघाडीतर्फे शिंदे शिवसेनेच्या वृषाली विनय भावे या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे उबाठा शिवसेनेच्या लिलाबाई सुरेश चौधरी यांची उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र ते युतीत आहेत. शहरात भाजप आणि आरएसएसचे प्राबल्य असले तरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही दोन्ही शिवसेनेमध्ये दुरंगी होणार आहे.
धरणगावच्या मतदाराची वार्डनिहाय संख्या
नगरपालिकेच्या निवडणुकीत २०१६च्या निवडणुकीच्या तुलनेत ३ हजार १३६ मतदानांची वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत १६,५१० पुरुष, १६.२३६ महिला, तसे तृतीय पंथीय उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण ३२.७४८ मतदार आपला अधिकार बजावतील. तसेच वॉर्ड क्रमांक दोनमध्ये दोन तृतीयपंथी मतदार आहेत.
नगरपालिकेची विक्रमी वसुली
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यामुळे नगर पालिकेच्या तिजोरीत गेल्या सात दिवसांत तब्बल १६ लाख ८२ हजार ४९४ रुपयांची भर पडली आहे. आतापर्यंत उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी ३१ तसेच नगरसेवक पदासाठी ३५४ अर्ज नेले आहेत. धरणगाव शहरात २३ नगरसेवक व एक नगराध्यक्ष अशी पदे आहेत. यात नगरसेवकांसाठी ८१ अर्ज व नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. कोणत्या पक्षातर्फे कोण उमेदवारी करणार? जागावाटप कसे होणार व कोणत्या पक्षातर्फे कोण उमेदवार असणार, याची अजुनही नागरिकांसह उमेदवारांना उत्सुकता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अशी आहे मतदारसंख्या
| वॉर्ड क्रमांक | पुरुष मतदार | महिला मतदार | एकूण |
|---|---|---|---|
| 1 | 1315 | 1258 | 2573 |
| 2 | 1363 | 1412 | 2775 |
| 3 | 1502 | 1497 | 2999 |
| 4 | 1720 | 1685 | 3405 |
| 5 | 1417 | 1463 | 2934 |
| 6 | 1530 | 1511 | 3041 |
| 7 | 1473 | 1505 | 2978 |
| 8 | 1262 | 1198 | 2460 |
| 9 | 1393 | 1337 | 2730 |
| 10 | 1521 | 1451 | 2978 |
| 11 | 1960 | 1915 | 3875 |
3875






