Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई,ठाणे, भिवंडीमधील पाणीकपात अखेर मागे! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय क्षेत्रात मुसळधार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे जलाशयांमधील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी 4 जलाशये पूर्ण क्षमतेनी भरली आहेत.त्यामुळे आता अखेर मुंबईत सुरु असणारी 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2024 | 02:32 PM
फोटो सौजन्य - Wikipedia

फोटो सौजन्य - Wikipedia

Follow Us
Follow Us:

मुंबईकरासांठी आनंदाची बातमी आहे. 5 जून 2024 पासून मुंबईत लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणीकपात आता अखेर रद्द करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. यापैकी विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर ही जलाशये ओसांडून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने मुंबईतील पाणीकपात रद्द कररण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, 29 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेदेखील वाचा- रायगडमध्ये मुसळधार पाऊस; पाली खोपोली राज्य महामार्गावरील पुलाला पाण्याचा वेढा

मुंबई महानगरपालिकेने शहरात 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपातीचा निर्णय लागू केला होता. मात्र पाऊस लांबल्याने मुंबईत 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांनी तळ गाठल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे जलाशयांमधील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत या जलाशयांमध्ये 66.77 टक्के इतका पाणीसाठा नोंदवण्यात आला. त्यामुळे आता अखेर मुंबईत सुरु असणारी 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात येणार आहे. आता मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

हेदेखील वाचा-ठाण्यात पावसाचा जोर वाढला; जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी 4 जलाशये पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत या जलाशयांमध्ये 66.77 टक्के इतका पाणीसाठा नोंदवण्यात आला. मोडकसागर तलावातून 13334 क्युसेक आणि तानसा जलाशयातून 17680 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित 3 जलाशयांमधील पाणीसाठ्यात देखील लवकरच वाढ होईल. त्यामुळे आता मुंबईकरांना वर्षभर पाण्याची चिंता करण्याची गरज नाही.

जून महिन्यात पाऊस लांबल्याने वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांनी तळ गाठला होता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार होती. मात्र आता अखेर ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. मुंबईत जुन अखेरीस पावसाचं आगमन झालं. पण आता काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे मुंबईत अनेक भागात दमदार पाऊस सुरु आहे. वाढत्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Web Title: There wont be any water cut in mumbai thane bhiwandi due to heavy rain in the reservoir area that supplies water to mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Maharashtra Rain Updates
  • Water Cut In Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Water Cut 2026:  मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई
1

Mumbai Water Cut 2026: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.