Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Water Cut 2026: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई

Mumbai Water Cut 2026: यंदा कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. एल निनो आणि हिंदी महासागर द्विध्रुव ही कमी पावसाची कारणे असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 12:41 PM
Mumbai Water Cut 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mumbai Water Cut 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

यंदा पाऊस कमी झाल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एल निनो आणि हिंदी महासागर द्विध्रुव या दोन कारणांमुळे यावर्षी पाऊसच कमी झाला. त्याचा थेट परिणाम मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही धरणांवर झाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने ऐन सणासुदीत मुंबईकरांना पाण्याची बचत करावी लागणार आहे. Mumbai Water Cut 2026:

महापालिकेने लोकांना सांगितले आहे की, पाणी जपून वापरा. नळ उगाच चालू ठेवू नका, कुठे गळती असेल तर ती लगेच दुरुस्त करा. ज्या पाण्याचा पुर्नवापर करता येईल तो करावा.

15 मे पासून पाणीकपात सुरू

पाण्याची टंचाई लक्षात घेऊन सरकारच्या जलसंपदा खात्याने आदेश दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने 15 मे 2026 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू केली. मनपाचे पाणीसाठा जास्त दिवस कसा टिकेल याकडे लक्ष आहे. सरकारने 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचे पाण्याचे नियोजन करायला सांगितले आहे. त्यामुळे पालिकेने अजून कडक नियम काढले आहेत.सोसायट्या, दुकाने, शाळांना सूचनाहाऊसिंग सोसायट्या, मोठी दुकाने, शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी वाचवण्याला जास्त महत्व द्या, असे आदेश दिले आहेत. सामान्य माणूस असो किंवा मोठा व्यापारी, सगळ्यांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करू नये.

पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी विहिरीचे पाणी, बोअरवेलचे पाणी वापरा, असे सांगितले आहे. ज्या ठिकाणी उद्योगधंदे आहेत, स्पोर्ट्स क्लब आहेत, त्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात 20 टक्के कपात कायम राहणार आहे.

रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी नको

कोर्टाच्या आदेशानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते धुतले जातात. पण आता रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नका. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातले पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरा, असे सांगितले आहे. बांधकामाच्या जागी पण हाच नियम लागू असेल. बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरायचे नाही.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! एम पूर्व-पश्चिम वॉर्डांत उद्या पाणी नाही

गाड्या धुणे, बागेतील झाडांना पाणी घालणे, रस्ता साफ करणे यासाठी पण विहीर किंवा बोअरवेलचेच पाणी वापरा. सार्वजनिक शौचालये चालवणाऱ्या संस्थांनी पण पर्यायी पाण्याचा वापर करावा.

स्विमिंग पूलवर परत निर्बंध

काही दिवसांपूर्वी स्विमिंग पूलसाठी असलेले निर्बंध काढले होते. पण आता पाणी कमी असल्याने ते निर्बंध परत लावले आहेत. स्विमिंग पूलसाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असा स्पष्ट आदेश आहे.

मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला! मुंबईच्या तलावांमध्ये ८८.१० टक्के पाणीसाठा

गळती थांबवण्यासाठी टीम तयार

पाण्याची गळती होऊन खूप पाणी वाया जाते. हे थांबवण्यासाठी जल अभियंता विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. कुठे गळती असेल तर ती लवकरात लवकर बंद केली जाईल.पालिकेने सांगितले आहे की पाण्याचा गैरवापर करताना कोणी आढळले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. हाच पाणीसाठा आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत पुरवायचा आहे.

Web Title: Mumbai water cut 2026 bmc water saving guidelines rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • mumbai water cut
  • Water Cut In Mumbai
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला,  बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता
1

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन
2

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा
3

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.