मुंबई – काल टि-20 विश्वचषकातील भारत पाकिस्तान यांच्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर थरारक सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 4 गडी राखून पाकिस्तानाला पाणी पाजले. या भारताच्या विजयानंतर देशात दिवाळी साजरी होत आहे. विजयाचे सेलिब्रेशन, जल्लोष साजरा होत असताना, या विजयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही सुद्धा साडे तीन महिन्यापूर्वी एक मॅच जिंकली…ती सुद्धा अशीच अटीतटीची मॅच होती, पण आम्ही जिंकलो, असं कालच्या भारत पाकिस्तान मॅचवर मुख्यमंत्री आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर खासदार अरविंद सावंत यांनी टोला लगावला आहे.
[read_also content=”प्रत्येक बालक सशक्त आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा https://www.navarashtra.com/maharashtra/striving-to-empower-and-empower-every-child-minister-mangalprabhat-lodha-339065.html”]
दरम्यान, कालच्या मॅचमध्ये प्रेक्षकांमध्ये पन्नास खोके..एकदम ओके, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर दिसले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर खासदार अरविंद सावंत बोलताना म्हणाले की, भारताने कालची मॅच जिंकताना पाकिस्तनाला मैदावार लोळवले, भारतीय संघ मैदानावर जिंकला…पण तुम्ही मैदान सोडून पळाला असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे व शिंदे गटाला लगावला आहे. त्यामुळ यावर शिंदे गटातून कोणाची प्रतिक्रिया समोर येते का हे पाहावे लागेल.