Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prithviraj Chavan PC: राजकीय नेत्यांना मुली पुरवणारे एपस्टीन कांड; तीन नेत्यांचा समावेश, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गुप्त माहिती काढणे (हनी ट्रॅप) असे गुन्हे आहेत. यामध्ये अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 16, 2025 | 06:20 PM
Prithviraj Chavan PC: राजकीय नेत्यांना मुली पुरवणारे एपस्टीन कांड;  तीन नेत्यांचा समावेश, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेतील उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे
  • भारतातील तीन आजी माजी खासदारांचा समावेश
  • अमेरिकेच्या सिनेटने या प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय
Prithviraj Chavan PC  News: “अमेरिकेतील उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमुळे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गोपनीय कागदपत्रे १९ डिसेंबर पर्यंत समोर येतील. त्यामध्ये भारतातील तीन आजी माजी खासदारांचा समावेश आहे,” असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ कदाचित याच दबावामुळे थांबविले असल्याची शक्यता ही त्यांनी पुण्यात वर्तवली.

Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या वार्तापालात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना पृथ्वीराज  चव्हाण म्हणाले, “अमेरिकेच्या सिनेटने या प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गुप्त माहिती काढणे (हनी ट्रॅप) असे गुन्हे आहेत. यामध्ये अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यात भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा समावेश असून, ही कागदपत्रे खुली झाल्यावर त्याचे गंभीर पडसाद देशातील राजकारणात उमटून पंतप्रधानपदी बदल होऊ शकतो.”  (Prithviraj chavan) 

जेफ्री एपस्टिन याला अटक केल्यानंतरही हाय सेक्युरिटीममध्ये ठेवण्यात आलं, कारण ट्रम्प आणि त्याचा खूप जवळचा संबंध असल्याची चर्चा होती. ट्रम्प हे त्या बाबतीत कोणतेही पुरावे समोर येऊ देणार नाही. हे उघडकीस आल्यामुळे गेल्या ५-७ वर्षांपासून तिथे खूप मोठा गदारोळ सुरू आहे. त्याने काय केलं, कोणाकोणावर अत्याचार केले. शोषण केलं हे सर्व उघडकीस आले पाहिजेअशी मागणी जोर धरत आहे. अनेक लहान मुलींनी एपस्टिनवर गंभीर आरोप केले आहे.  हा विषय़ फार  संवेदनशील असल्याने त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. पण ऑगस्ट २०२९ मध्ये त्याचा तुरुंगात मृत्यू झाला.  व्हिडीओ तपासला असता त्यात नेमका २ मि. कॅमेरा बंद होता.  त्यामुळे अनेकांनी त्याचा खून झाल्याचा दावा केला.   यात हिलरी क्लिंटनच्या सेक्रेटरीचे नाव घेतले गेल्याचा दावा केला गेला. पण त्याने जे व्हिडीओ चित्रीकरण केलं होते. ते अमेरिकेच्या कायदेमंत्र्याकडे गेले.  हे सर्व कागद त्यांच्याकडे आहे. या जेफ्रीची जी ग्राहकांची लिस्ट आहे म्हणजेच त्याने यात कोणाकोणाला गुंतवलं याची सर्व माहिती त्या कायदे मंत्र्याकडे आहे. पुढ ट्रम्प यांनी यात हस्तक्षेप करत या प्रकरणातील कोणतीही कागदपत्रे सार्वजनिक  न कऱण्याचे आदेश दिले होते.

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल

पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एपस्टीन प्रकरण उघड न झाल्यास किंवा दोषींना शिक्षा न झाल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, अशी भीती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षातील खासदारांना आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्रम्प यांच्यावर दबाव टाकत संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली.

या मागणीनंतर 19 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एक कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार एका महिन्याच्या आत ‘एपस्टीन फाईल्स’ खुल्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे 19 डिसेंबर रोजी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

 

 

Web Title: Three current and former mps named in epstein files prithviraj chavan makes explosive revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • maharashtra election 2024
  • Prithviraj Chavan

संबंधित बातम्या

Prithviraj chavan News: निवडणूक आयुक्तांची निवड, मतदार याद्यांमधील घोळ अन्; पृथ्वीराज चव्हाणांनी ‘त्या’ गोष्टींकडे वेधले लक्ष
1

Prithviraj chavan News: निवडणूक आयुक्तांची निवड, मतदार याद्यांमधील घोळ अन्; पृथ्वीराज चव्हाणांनी ‘त्या’ गोष्टींकडे वेधले लक्ष

Prithviraj Chavan : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ
2

Prithviraj Chavan : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ

BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा
3

BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.