Nitish Kumar News: नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाब ओढला...; विरोधक आक्रमक, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये नितीश कुमार एका मुस्लिम महिला आयुष डॉक्टरला नियुक्ती पत्र देताना तिच्या चेहऱ्यावरून हिजाब काढताना ओढतात. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी नितीश कुमार यांच्या मागे उभे आहेत आणि व्हिडिओमध्ये ते नितीश कुमार यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्याचवेळी बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार हसताना दिसत आहेत.
हिजाब घातलेली नवनियुक्त डॉक्टर तिचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी आली त्यावेळी नितीश कुमारांनी महिलेला, “हे काय आहे, असे विचारत स्टेजवर उभे असलेले नितीश कुमार थोडेसे वाकले आणि तिच्या चेहऱ्यावरील हिजाब खाली ओढला. आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देण्याच्या कार्यक्रमाचे फोटो नितीश कुमार यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंसोबतच्या पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी लिहिले की, “आज मी मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या ‘संवाद’ येथे १,२८३ आयुष डॉक्टरांच्या (आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी) नियुक्ती पत्र वितरण समारंभाला उपस्थित राहिलो.”
पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता
विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने घटनेची व्हिडिओ क्लिप शेअर करून नितीश कुमार यांना लक्ष्य केले. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. त्यांची निर्लज्जता पहा. जेव्हा एक महिला डॉक्टर तिचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी आली तेव्हा नितीश कुमार यांनी तिचा हिजाब ओढला.”
In disguise of mental health, Nitish kumar (CM from #Bihar )is openly violationg woman’s right to religion. If you’re not much sensible to respect the religious norms atleast be the human-being enough to value the respect of the woman. #NitishKumarMafiMango pic.twitter.com/b0g2VC2CDL — Ridaa Aghha (@agha1158941) December 15, 2025






