PMPML Bus
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत तीन नवीन बसमार्गांची सुरुवात करण्यात आली असून, एका विद्यमान बसमार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ, नियमित आणि सहज उपलब्ध सार्वजनिक वाहतूक सेवा मिळणार आहे.
बसमार्ग क्रमांक ७९ – हिंजवडी (माण) फेज ३ ते डेक्कन जिमखाना
या मार्गावरील बस हिंजवडी फेज ३ येथून सुरुवात करून इन्फोसिस फेज २, शिवाजी चौक, वाकड ब्रिज, सुतारवाडी, बावधन, चांदणी चौक, कोथरूड डेपो, वनाज कंपनी, एस.एन.डी.टी. कॉलेजमार्गे डेक्कन जिमखान्यापर्यंत धावणार आहे.
बसेसची संख्या : २
वारंवारिता : दर १ तास ४० मिनिटांनी
पाकिस्तानचे तुकडे निश्चित! BLA ने 14 सैनिकांना यमसदनी धाडले; Video मधले सत्य काय?
बसमार्ग क्रमांक ३१८ – पुणे स्टेशन ते कृष्णानगर
पुणे स्टेशनहून आरटीओ, सिमला ऑफिस, औंध गाव, काळेवाडी फाटा, केएसबी चौक, घरकुल वसाहत चिखली, साने चौक मार्गे ही बस कृष्णानगरपर्यंत प्रवास करेल.
बसेसची संख्या : २
वारंवारिता : दर १ तास २० मिनिटांनी
बसमार्ग क्रमांक वाय-३८ – भोसरी ते तुळापुर (फक्त रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी)
या मार्गावरील बस भोसरी येथून शास्त्री चौक, थोरल्या पादुका मंदिर, देहू फाटा, आळंदी, सोळूगाव, वडगाव शिंदे फाटा, मरकळ गाव मार्गे थेट तुळापुर या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळापर्यंत धावणार आहे.
बसेसची संख्या : २
वारंवारिता : दर १ तास १५ मिनिटांनी
भारतात परदेशी जाणाऱ्या ट्रेनही धावतात! जाणून घ्या कोणकोणत्या देशात रेल्वेने जाता येईल
विस्तारित बससेवा :
बसमार्ग क्रमांक २९७ – राजस सोसायटी ते शिवाजीनगर रेल्वे स्टेशन (मार्ग विस्तार)
यापूर्वी स्वारगेटपर्यंत चालणारी ही बस सेवा आता शिवाजीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. राजस सोसायटी येथून सुरू होणारी ही बस आता कात्रज, बालाजी नगर, स्वारगेट, अ.ब. चौक, शनिवार वाडा, सिमला ऑफिस मार्गे थेट शिवाजीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचेल.
बसेसची संख्या : १ वारंवारिता : दर २ तासांनी
पीएमपीएमएलच्या या नव्या सेवांमुळे पुणे शहर व उपनगरातील रहिवाशांना विविध महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. प्रवासाचा वेळही वाचेल आणि गर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात लवकरच १ हजार नव्या बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १३) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत ५०० बस खरेदीसाठी पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निधी उपलब्ध करून देणार आहेत. उर्वरित ५०० बस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)तर्फे स्वतंत्रपणे खरेदी करण्यात येणार आहेत. संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.