Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

तोरणगण घाटात तीन वाहनांचा अपघात; ट्रक उलटला पण सुदैवाने जीवितहानी नाही. स्थानिकांचा प्रशासनावर आरोप, सुरक्षा उपायांचा अभाव असल्याने अपघातांची मालिका थांबत नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 12, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात झाल्याची घटना दि.११ रोजी घडली असून, त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. जव्हार-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील हा घाट तीव्र वळणं आणि उतारांसाठी कुप्रसिद्ध आहे. या अपघातात एक ट्रक पलटी झाला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरीदेखील या घटनेमुळे परिसरातील नागरिकांचा रोष वाढला आहे.

आंदोलनादरम्यान गायब मात्र योजनांचा आढावा घ्यायला पुढाकार; सारथीच्या लाभार्थ्यांबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश

गेल्या काही वर्षांपासून तोरणगण घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. ब्रेक फेल होणे, वळणांचा योग्य अंदाज न येणे, वाहन चालकांचा ताण, तसेच प्रशासनाचा निष्काळजीपणा ही कारणं वारंवार पुढे येत आहेत. धोकादायक ठिकाणी सूचना फलकांचा, क्रॅश बॅरिअर्सचा आणि संरक्षण भिंतींचा पुरेसा अभाव आहे. चालकांना सावध करण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने वाहनचालकांना अक्षरशः जिवावर उदार होऊन घाटमार्गावर प्रवास करावा लागतो.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, तीव्र वळण आणि उतारांच्या आधी स्पष्ट सूचना फलक असणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वळण दुरुस्त करून उतार कमी करणे आवश्यक आहे. याशिवाय वाहनांना थांबून विश्रांती घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. अपघात झाल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर आपत्कालीन सुविधा असणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे बेठक संपन्न; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

नागरिकांचा आरोप आहे की, एवढ्या अपघातांनंतरही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. परिणामी लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. तोरणगण घाटासह अन्य धोकादायक रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने रस्त्यांची पुनर्रचना करणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करवून घेणे आणि आपत्कालीन सेवांचा वेगवान प्रतिसाद मिळवून देणे गरजेचे आहे. येत्या काळात अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी सरकार व बांधकाम विभागाने ठोस पावले उचलून नागरिकांचा विश्वास संपादन करावा, अशी मागणी घाट परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Three vehicles collide in a row at torangan ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव
1

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले
2

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
3

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था
4

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.