
Tight police security outside teachers' TET exam hall in Solapur News update
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) परीक्षा 2025 ही दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी 10.00 वा. ते 05.00 वा. या वेळेत सोलापूर शहरातील खाली नमुद 34 परीक्षा उपकेंद्रांवर होणार आहे.
सदर परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स सेंटर, फैक्स, ईमेल, रेडिओ, इंटरनेट अशा दळणवळण सुविधा यांचा परीक्षेच्या अनुषंगाने गैरवापर होण्याची शक्यता आहे, अशा सुविधा कार्यरत ठेवणे, वायरलेस सेंट, ट्रांझिटर, मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, संगणक गणनायत्र (कॅल्क्युलेटर), ई-मेल, इंटरनेट, झेरॉक्स सेंटर यासारख्या दळणवळण साधनांचा परीक्षा केंद्राच्या आवारात उपयोग केला जातो.
तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत नसलेली व्यक्ती परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करणे, तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परीक्षार्थींना कोणताही अडथळा होऊ नये आणि परीक्षा प्रक्रियेशी संबधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्ये चोखपणे, कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परीसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चा आदेश लागू करणे निकडीचे असल्याने. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे/विशा), सोलापूर शहर डॉ. अश्विनी पाटील, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये यांनी असा आदेश दिला आहे की, दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 07.30 वा. ते सायंकाळी 06.00 वा. पर्यंत पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हदीचे कार्यक्षेत्रातील खाली नमुद सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात खालील कृती करण्यास बंदी घालत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे. परीक्षा केंद्राच्या परिसरात सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स, फैक्स सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कैफे अशा दळणवळण सुविधा आणि पानपट्टी कार्यरत ठेवणे, परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, सेल्युलर फोन, वायरलेस सेट, ट्रान्झीटर व इतर माध्यमासह प्रवेश करणे. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणत्याही वाहनांस प्रवेश करणे, असे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर परीक्षा प्रक्रियेशी संबंधित नसलेली व्यक्ती (उमेदवारांचे नातेवाईकासह) परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात प्रवेश करणे. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणे. या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहित 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. असे आदेश पोलीस उप आयुक्त,(गुन्हे/विशा) शहर डॉ. अश्विनी पाटील यांनी दिले आहेत.