Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यात पावसाचे थैमान! महाबळेश्वरमध्ये १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस; ५ तालुक्यांतील शाळांना सुटी, तर…

महाबळेश्वरमध्ये गेल्या १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस पडल्याने सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा, पाटण, महाबळेश्वरसह ५ तालुक्यांतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 06, 2026 | 06:57 PM
सातारा जिल्ह्यात पावसाचे थैमान! महाबळेश्वरमध्ये १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस (Photo Credit- X)

सातारा जिल्ह्यात पावसाचे थैमान! महाबळेश्वरमध्ये १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्ह्यात पावसाचे थैमान!
  • महाबळेश्वरमध्ये १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस
  • ५ तालुक्यांतील शाळांना सुटी, तर…
सातारा, दि. ६ (प्रतिनिधी): महाबळेश्वरमध्ये गेल्या शंभर वर्षांतील विक्रमी तब्बल ११ इंच पावसाची नोंद झाल्याने सातारा जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. दरडी कोसळणे, घरांची पडझड, रस्ते बंद होणे, झाडे उन्मळून पडणे आणि एका व्यक्तीचा मृत्यू अशा घटनांनी जिल्हा हादरला असून प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिवसभर जिल्हाभरातील घटनांची नोंद घेत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

पावसाच्या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाचा तातडीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एनडीआरएफसह सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, नवजा, आठवली, बामणेवाडी आदी अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील प्रमुख घटना:

  • फलटण तालुक्यात ताथवडे घाटात दगड वाहनावर कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू.
  • सातारा तालुक्यातील कारे येथील जिल्हा परिषद शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे उडाला.
  • पाटण तालुक्यातील नारळवाडी येथे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प.
  • मेढा–पाचगणी मार्गावरील केळकर घाटात दरड कोसळून रस्ता बंद; नंतर वाहतूक सुरू.
  • खंडाळा तालुक्यातील भादे येथे घराची भिंत कोसळून मोठे नुकसान.
  • पाटण, सातारा आणि खंडाळा तालुक्यांत मिळून २४ घरांची पडझड.
  • खंडाळा तालुक्यात दोन शेळ्यांचा मृत्यू.
  • महाबळेश्वर तालुक्यातील अकरावाडी येथील १७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…

दरम्यान, सडा वाघापूर, ओझर्डे, लिंगमळा, ठोसेघर आणि महाबळेश्वर येथील एलफिन्स्टन पॉइंट परिसरात चिखल आणि घसरडा रस्ता निर्माण झाल्याने पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

सातारा शहरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे राजवाडा, पोवई नाका आणि भाजी मंडई परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले. व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून रेनकोट, छत्र्या आणि छत्री दुरुस्तीच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे.

दुसरीकडे, ठोसेघर, भांबवली, कास आणि महाबळेश्वर परिसरातील धबधबे दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढत असला, तरी प्रशासनाने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि जावळी या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५२.७ मिमी पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वरमध्ये २८६ मिमी (सुमारे ११ इंच) पाऊस पडला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४८ तासांत ४.११ टीएमसी पाण्याची भर पडल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain : चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

Web Title: Torrential rains wreak havoc in satara district mahabaleshwar records a historic 11 inches of rainfallthe highest in 100 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Maharashtra Rain
  • Mansoon session
  • Satara Rain

संबंधित बातम्या

रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट; सर्व शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी, तर ‘या’ जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
1

रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट; सर्व शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी, तर ‘या’ जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

‘मिसिंग लिंकवरील वाहतूक…’, दरड कोसळलेल्या भागाची पाहणी केल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मोठे विधान
2

‘मिसिंग लिंकवरील वाहतूक…’, दरड कोसळलेल्या भागाची पाहणी केल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मोठे विधान

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…
3

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…

Mahabaleshwar Monsoon Update:महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी, स्ट्रॉबेरी शेती पाण्याखाली
4

Mahabaleshwar Monsoon Update:महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी, स्ट्रॉबेरी शेती पाण्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.