Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ‘शाब्दिक धुलाई’नंतर वाहतूक निरीक्षक खान यांनी मागितली माफी; ‘त्या’प्रकरणी सपशेल माघार

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर झालेल्या या अन्यायाचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर सोमवारी (८ जून) महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाने बस स्थानकावर धडक मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2026 | 08:38 AM
Satara News : 'शाब्दिक धुलाई'नंतर वाहतूक निरीक्षक खान यांनी मागितली माफी; 'त्या'प्रकरणी सपशेल माघार

Satara News : 'शाब्दिक धुलाई'नंतर वाहतूक निरीक्षक खान यांनी मागितली माफी; 'त्या'प्रकरणी सपशेल माघार

Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : महाबळेश्वर बस स्थानकात पर्यटकांसह पत्रकार अजित कुंभारदरे यांच्यासोबत अत्यंत उद्धट, असभ्य आणि अपमानास्पद वर्तन करणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याला सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पत्रकार एकजुटीचा मोठा विजय झाला असून, सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

रविवारी (दि.७) दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला होता. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर झालेल्या या अन्यायाचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर सोमवारी (८ जून) महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाने बस स्थानकावर धडक मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पर्यटनाची राजधानी असलेल्या महाबळेश्वरच्या एसटी आगारात रविवारी दुपारी वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याने पर्यटकांना वेठीस धरले होते. याच वेळी तिथे उपस्थित असलेले पत्रकार अजित कुंभारदरे यांच्याशीही खान याने अत्यंत उर्मट आणि कायदे धाब्यावर बसवून हुकूमशाही भाषेत वर्तन केले. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण राज्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

ऐतिहासिक पुण्याची ‘हेरिटेज सफर’ जोरात! सांस्कृतिक पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती; पण…

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी महाबळेश्वर येथिल जिल्हा पत्रकार संघटनेचे सदस्य विलास काळे व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश पल्लोड यांना तातडीने आंदोलनाचे आदेश दिले. सोमवार सकाळी महाबळेश्वरमधील पत्रकार, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत बस स्थानकावर धडक मोर्चा काढला.

पत्रकारांच्या या आक्रमक आंदोलनाची कुणकुण लागताच एसटी प्रशासनाची तारांबळ उडाली. खबरदारी म्हणून स्थानकातील सर्व बसेस बाहेर काढण्यात आल्या होत्या आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, नेहमी गणवेशाचा नियम फाट्यावर मारणारा वाहतूक निरीक्षक खान मारहाण होण्याच्या भीतीने पूर्ण गणवेशात हजर होता.

आंदोलनकर्त्यांनी ‘पत्रकार एकजुटीचा विजय असो’ आणि मुजोर खानच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आगाराचे प्रमुख महेश जाधव आंदोलकांना सामोरे आले. मात्र, मोर्चेकऱ्यांनी “त्या मुजोर खानला समोर बोलवा,” अशी आक्रमक भूमिका घेतली. खान समोर येताच आंदोलनकर्ते आणि शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. खानने काल पत्रकारांना जी भाषा वापरली होती, त्याच शेलक्या भाषेत मोर्चेकऱ्यांनी त्याची जोरदार ‘शाब्दिक धुलाई’ केली.

काही आंदोलक त्याच्या अंगावर धावून गेले असता पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती आटोक्यात आणली. पत्रकारांचा हा संताप पाहून अखेर मुजोर खानची बोलती बंद झाली आणि त्याने सपशेल शरणागती पत्करत सर्वांची जाहीर माफी मागितली.

पत्रकारांच्या या लढ्याला महाबळेश्वरमधील सर्वच पक्षांनी पक्षभेद विसरून पाठिंबा दिला. आंदोलनात तालुकाध्यक्ष रमेश पल्लोड, जिल्हा सदस्य विलास काळे, उपाध्यक्ष सचिन शिर्के, सचिव संजय दस्तुरे, अजित जाधव, अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, अजित कुंभारदरे, शरद झावरे, राजेश सोंडकर, राहुल शेलार, संदीप देवकुळे, रियाज मुजावर, संदेश भिसे, जितेंद्र कारंडे, मिलिंद काळे यांच्या सह पंचायत समिती सदस्य संजय शेलार, शिवसेना (ठाकरे गट) नेते राजेश कुंभारदरे, महेश गुजर, शंकर ढेबे; शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विजय नायडू, वर्षा आरडे, मेघा चोरगे, राजेंद्र पंडित, चंद्रकांत सपकाळ (गुरुजी), सचिन गुजर, गोपाळ लालबेग, सचिन कुंभारदरे; रिपाईचे विनय गायकवाड, मनोज ताथवडेकर, बाळकृष्ण साळुंखे, दीपक वर्पे यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाबळेश्वर आणि सातारा पत्रकार संघाच्या वतीने सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांना निवेदन देऊन खानच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती. घटनेची गांभीर्य ओळखून विभागीय नियंत्रकांनी कोणतीही दिरंगाई न करता शाहरुख खान याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले.

अत्यंत कमी वेळात साताऱ्यातील सर्व पत्रकार बांधवांनी पक्ष, माध्यम आणि वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून जी अभूतपूर्व एकता दाखवली, त्यामुळेच प्रशासनाला नमते घ्यावे लागले. पत्रकारितेवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध आणि दबावाविरुद्ध भविष्यातही अशीच वज्रमूठ कायम ठेवली जाईल,” असा निर्धार जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी या आंदोलनानंतर व्यक्त केला

महाबळेश्वरमध्ये आमच्या सहकारी अजित कुंभारदरे यांच्यासोबत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय व संतापजनक आहे संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व पत्रकार योगदान देत असतात. अशा पत्रकारांचा अवमान करून मुजोर शाहरुख खान यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या या ”खाना”चा आम्ही महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत.

– विलास काळे, सदस्य जिल्हा पत्रकार संघ

Web Title: Traffic inspector shahrukh khan apologized after a verbal dressing down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Satara News
  • st

संबंधित बातम्या

Satara News : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात शिवभक्तांचा उत्साह; उदयनराजे भोसले यांनी शिवरायांना वाहिली आदरांजली
1

Satara News : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात शिवभक्तांचा उत्साह; उदयनराजे भोसले यांनी शिवरायांना वाहिली आदरांजली

मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश
2

मालतपूरमध्ये संतापाचा उद्रेक; डंपर अपघातानंतर रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जनआक्रोश

Karad Flyover Opening: घाईगडबडीत अपघातांना आमंत्रण? कराड उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या हालचालींवर नागरिक संतापले
3

Karad Flyover Opening: घाईगडबडीत अपघातांना आमंत्रण? कराड उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या हालचालींवर नागरिक संतापले

महाराष्ट्र कृषी सेवा अंतिम गुणवत्ता यादी रखडली; MPSC च्या दिरंगाईचा उमेदवारांना पुन्हा फटका
4

महाराष्ट्र कृषी सेवा अंतिम गुणवत्ता यादी रखडली; MPSC च्या दिरंगाईचा उमेदवारांना पुन्हा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.