Changes in the posts of Officer Joint Commissioner by Mumbai Municipal Commissioner
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर नवीन आर्थिक वर्षाच्या तसेच गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला मुंबई महापालिकेच्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या बढती आणि बदली करून महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी एक प्रकारे खांदेपालट केली आहे.
सह आयुक्त तथा उपायुक्त यांच्या बदली करताना 3 सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त पदी बढती देत नवीन जबाबदारी सोपवली आहे. चार नवीन सहाय्यक आयुक्त यांच्या नियुक्तीनंतर सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्यांच्या या बढती आणि बदलीमुळे नवीन आर्थिक वर्षात आता हे अधिकारी नव्या जोमाने कामाला लागलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या/पदस्थापना विषयक आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा