Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : “येत्या ४ वर्षात एसटीला फायद्यात आणणार..!”, काय आहे प्रताप सरनाईक यांचा प्लॅन?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वाचे विधान केले. दरवर्षी 5000 नवीन बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून, पुढील 3-4 वर्षांत एसटी तोट्यातून बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2025 | 04:49 PM
"येत्या ४ वर्षात एसटीला फायद्यात आणणार..!", काय आहे प्रताप सरनाईक यांचा प्लॅन? (फोटो सौजन्य-X)

"येत्या ४ वर्षात एसटीला फायद्यात आणणार..!", काय आहे प्रताप सरनाईक यांचा प्लॅन? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या ४ वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना परिवहन मंत्र्‍यांनी निर्णय घेतला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर तसेच सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, गेल्या ४५ वर्षांमध्ये केवळ ८ वर्ष एसटी महामंडळ चालनिय नफ्यात होते. राज्यातील तब्बल ९० टक्के लोकसंख्येला थेट परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ” लोकवाहिनी ” आहे. दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित दळणवळण सेवा देणारी एसटी भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे, ही काळाची गरज आहे.

MSRTC White Paper: लालपरीच्या अडचणीत वाढ! परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर, किती कोटींचा तोटा? जाणून घ्या सविस्तर बातमी

सन २०१८-१९ मध्ये एसटीचा संचित तोटा सुमारे ४६०० कोटी होता. परंतु करोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे व नंतर चालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे एसटीचा संचित तोटा आता १०३२२ कोटी पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणे सुमारे ३००० कोटी पर्यंत आहेत. अर्थात यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एस टी महामंडळाला मदत करणे अत्यंत आवश्यक असून एसटीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी निश्चितच यासाठी पाठपुरावा करेन अशी ग्वाही प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

एस.टी. तेथे एसटी

डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांसाठी (शेड्युल ट्राईब एस.टी.) लवकरच थेट एसटी सेवा सुरू करण्याचा आम्ही संकल्प सोडला असून जिथे केवळ रस्ता अरुंद असल्यामुळे आमच्या ११ मीटर व १२ मीटर च्या मोठ्या बसेस पोहोचू शकत नाहीत. तिथं खास ५० मिनी बसेस आम्ही घेणार आहोत. या मिनी बसेस चालवणे एसटीच्या दृष्टीने तोट्याचे असले तरी आदिवासी बांधवांसाठी तो तोटा सहन करून आम्ही त्यांना प्रवासी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

एसटीची श्वेतपत्रिका जारी

एसटी महामंडळाला सध्या दररोज १ ते २ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आतापर्यंत तर एकूण तोटा १०,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. मार्च २०२४ मध्ये भाड्यात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. गेल्या ९ वर्षांत एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२३ वगळता कोणत्याही महिन्यात नफा कमावलेला नाही. त्या एका महिन्यात ₹ १६.०८ कोटींचा नफा नोंदवला गेला. महामंडळावर सध्या कर्मचाऱ्यांचे ₹३,५०० कोटी आणि पायाभूत सुविधा आणि पुरवठा देणी म्हणून ₹७,००० कोटी देणे आहे.

Nitin Gadkari : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीचं अडकेल वाहतूक कोंडीत; चक्क दौरा करावा लागला रद्द

Web Title: Transport minister pratap sarnaik on in the next 4 years we will bring the st bus into profit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, या महिन्याचा पगार आधीच मिळण्याची शक्यता
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, या महिन्याचा पगार आधीच मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई
2

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका
3

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
4

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.