Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता अमराठी चालकही बोलणार मराठी! परिवहन मंत्र्यांचं संपादकांना खुलं पत्र; सहकार्यासाठी माध्यमांना घातली साद

मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची आणि सामाजिक एकात्मतेची ओळख आहे. या भाषेचा सन्मान आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 11, 2026 | 06:06 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची आणि सामाजिक एकात्मतेची ओळख आहे. या भाषेचा सन्मान आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहतूक चालकांनी व्यवहारिक मराठी शिकावी आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा, या उपक्रमाला व्यापक लोकसमर्थन मिळावे यासाठी त्यांनी सर्व मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना खुले पत्र लिहून सहकार्याचे आवाहन केले आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड

पत्रात सरनाईक काय म्हणाले?

आपल्या पत्रात सरनाईक यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यावसायिक प्रवासी वाहन चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर वाढल्यास केवळ भाषेचे संवर्धन होणार नाही, तर समाजातील परस्पर संवाद अधिक सुसंवादी, आत्मीय आणि परिणामकारक बनेल.

भाषा संस्कृतीची वाहक

मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, भाषा ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नसून ती संस्कृतीची वाहक असते. एखाद्या समाजाची परंपरा, मूल्ये आणि भावविश्व भाषेतूनच जपले जाते. त्यामुळे मराठी भाषेतून संवाद होणे आणि तो दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग बनणे आवश्यक आहे.

प्रवाशांशी मराठीत संवाद

मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील विविध भागांत अनेक अमराठी चालक प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अनेकदा हिंदी किंवा इतर भाषांमध्ये संवाद साधला जातो. मात्र आता हेच चालक मराठी शिकून प्रवाशांशी मराठीत संवाद साधू लागले, तर ते मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि सामाजिक समन्वयासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. “आपण आपल्या राज्यात प्रवासी म्हणून किंवा नागरिक म्हणून वावरताना मराठी भाषेचा आग्रह धरणे स्वाभाविक आहे. मराठीचा अभिमान आणि तिचा वापर ही सवय प्रत्येकामध्ये रुजविण्याची वेळ आता आली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख

माध्यमांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख करताना सरनाईक यांनी म्हटले आहे की, समाजमन घडविण्यात प्रसारमाध्यमांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या उपक्रमाला वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धी मिळाल्यास मराठी भाषा शिकण्याची चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी बनेल. माध्यमांच्या सहकार्यामुळे मराठी संवाद संस्कृतीला नवे बळ मिळेल आणि जनजागृतीचा हा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता यांचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून केले आहे.

ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Web Title: Transport minister pratap sarnaik open letter to editors urging non marathi drivers to learn marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Business News
  • Maharashtra Road Transport
  • Marathi News
  • Pratap Saranaik
  • Public Transport

संबंधित बातम्या

Mango Export: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही? अखेर सरकारने स्पष्टच सांगत केला खुलासा…
1

Mango Export: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही? अखेर सरकारने स्पष्टच सांगत केला खुलासा…

आता याचेही दर वाढले… केस कापणं, दाढी करणं महागलं, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढ
2

आता याचेही दर वाढले… केस कापणं, दाढी करणं महागलं, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढ

रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर
3

रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
4

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.