Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडून आधीच विविध करांचा बोजा सहन करणाऱ्या बस व्यावसायिकांवर आता 'ई-चलन'च्या अन्यायकारक आणि जुलमी दंड आकारणी केली जात आहे.याविरोधात बस वाहतूक संघटनेने (आरटीओ) कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2026 | 12:34 PM
Kolhapur News :  वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा
Follow Us
Follow Us:
  • वाहतूक संघटनांचा एल्गार;
  • ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडून आधीच विविध करांचा बोजा सहन करणाऱ्या बस व्यावसायिकांवर आता ‘ई-चलन’च्या अन्यायकारक आणि जुलमी दंड आकारणी केली जात आहे. या जाचक अटींमुळे बस व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली असून, याविरोधात कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेने प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ‘ई-चलनचा जुलूम बंद करा’, ‘वाहतूकदारांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी आरटीओ कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. या मोर्चामध्ये बस, ट्रक, टेम्पो, कॅब तसेच इतर व्यावसायिक वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेतर्फे महालक्ष्मी चेंबर्स येथून या मोर्चाला सुरुवात झाली, मोठ्या संख्येने बसेसचा ताफा घेऊन वाहतूकदार आरटीओ कार्यालयावर धडकले.

संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात, ई-चलनद्वारे आतापर्यंत आकारण्यात आलेले सर्व दंड तत्काळ रद्द करण्यात यावेत, ६० किमीची वेग मर्यादा अत्यंत कमी असून ती किमान ५० टक्क्यांनी वाढवण्यात यावी, रस्त्यावर जागोजागी फोटो काढून अनियंत्रितपणे दंड आकारण्याची पद्धत तत्काळ बंद व्हावी, ५० टक्के आगाऊ दंड भरल्याशिवाय पुढील प्रक्रिया न करण्याची सक्ती रद्द करावी, दुहेरी कर आकारणी थांबवा एकाच रस्त्यासाठी ‘रोड टॅक्स’ आणि ‘टोली’ अशी दुहेरी वसुली थांबवून वाहतूकदारांना दिलासा द्यावा, दंडाच्या माध्यमातून केवळ महसूल गोळा करण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन व्यवसायासाठी घातक आहे, तो बदलावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा

मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भौर यांनी कार्यालयाच्या गेटवर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बस व्यावसायिकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्याऱ्यांनी दिले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या आंदोलनात अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, प्रदीप राठोड, राजू ढाले, मनोज चौगुले, पंकज त्रिपाठी, निवास पोवार, अशोक शिंदे, आरिफ कुचकोरी, दिलदार मुजावर, रफिक राऊटर, गौरव कुसाळे, उत्कर्ष पवार, उज्वल लिंगराज, दत्तात्रय पाताडे, रियाज मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो बस मालक आणि चालक उपस्थित होते.

या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार संघटना आणि कोल्हापूर लॉरी ऑपरेटर असोसिएशन यांसारख्या विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आआंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.

66 आधीच डिझेल दरवाढ आणि विविध करांमुळे बस व्यवसाय प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. त्यात ई-चलनचा हा नवीन जाध सुरू झाला आहे. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर बस व्यवसाय पूर्णपणे बंद पडेल.
– सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटना

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Web Title: Transport organizations protest dhada march on rto office against e challan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Public Transport
  • RTO

संबंधित बातम्या

Driving Licence : वयाच्या 50 वर्षांपर्यंत लायसन्स होणार वैध; RTO चे टेन्शन संपले, सर्व सेवा घरबसल्या ऑनलाइन होणार
1

Driving Licence : वयाच्या 50 वर्षांपर्यंत लायसन्स होणार वैध; RTO चे टेन्शन संपले, सर्व सेवा घरबसल्या ऑनलाइन होणार

Car-Free Friday: नो कार, नो कॅब… फक्त सार्वजनिक वाहतूक! मुंबईच्या बीकेसीमध्ये देशातील पहिला ‘कार-फ्री फ्रायडे’ उपक्रम सुरू
2

Car-Free Friday: नो कार, नो कॅब… फक्त सार्वजनिक वाहतूक! मुंबईच्या बीकेसीमध्ये देशातील पहिला ‘कार-फ्री फ्रायडे’ उपक्रम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.