महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात 'हीट वेव्ह'चा इशारा
वाढत्या तापमानाबाबत भूगोल व पर्यावरण तज्ज्ञ युवराज मोटे यांनी ‘अर्बन हीट आयलंड’ या संकल्पनेद्वारे धोक्याचा इशारा दिला आहे. शहरांमधील हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत असून काँक्रीटीकरण वाढत आहे. यामुळे शहरे आता ‘उष्णतेची बेटे’ बनत आहेत. पूर्वीचे ‘सावलीचे रस्ते’ आता हरवले असून, वृक्षतोडीमुळे शहरांचे तापमान ग्रामीण भागापेक्षा अधिक राहत आहे. सावलीचे रस्ते पुन्हा निर्माण करणे ही आता काळाची गरज आहे, ₹ असे युवराज मोटे यांनी स्पष्ट केले.
वाढत्या उन्हामुळे राज्यातील तलाव आणि पाणवठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. यामुळे भविष्यात तीव पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे आणि शहरांचे हरित क्षेत्र विकसित करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे.
अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद
सध्या वातावरणात होणारे बदल है शहरामधील हरित क्षेत्र वेगाने कमी होत असून कॉक्रीटीकरण वाढत आहे, ज्यामुळे शहरांचे रूपांतर ‘अर्बन हीट आयलंड’ मध्ये होत आहे. पूर्वी आपल्याकडे ‘सावलीचे रस्ते’ ही संकल्पना होती, मात्र आता ती नष्ट होत चालली आहे. वाढल्या तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे बाधीभवन वेगाने होऊन भविष्यात पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते, त्यामुळे आता केवळ झाडे लावणेच नव्हे, तर शहरांचे हरित नियोजन आणि पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे.
– युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण तज्ज्ञ
उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारपेठेतही बदल दिसून येत आहेत. कपड्यांच्या दुकानांमधील स्वेटर आणि जंकिटची जागा आता सनकोट, गॉगल आणि टोप्यांनी घेतली आहे. वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक आतापासूनच उन्हाळी साहित्य खरेदीला प्राधान्य देत आहेत.






