Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

वृक्षगणना हे शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, तरी आपल्या सोसायटीमध्ये किंवा खाजगी मालमतेमध्ये जेव्हा प्रगणक वृक्षांची माहिती घेण्यासाठी येतील,तेव्हा त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 12:30 PM
आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

Follow Us
Follow Us:

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत यावर्षी मुंबई शहरातील वृक्षगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम ‘सार आयटी रिसोर्सेस’ या खाजगी कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील प्रत्येक वृक्षाची नोंद केवळ कागदोपत्री न राहता, आधुनिक उपकरणांच्या आणि विशेष मोबाईल ॲपच्या सहाय्याने शाखीय पद्धतीने घेतली जाणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात लोकसहभाग वाढवण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. या गणनेत जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी आणि महापालिकेच्या उद्यान विभागासह इतर विभागांतील अधिकारी सहभागी व्हावेत, असा पालिकेचा प्रयत्न आहे.(फोटो सौजन्य – AI)

डीआरपी सीईओंची डीबीए शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा; ‘अनिर्णित पात्रते’बाबत सेक्टरनिहाय शिबिरे आयोजित केली जाणार

शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचे पाऊल

या मोहिमेबाबत मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी म्हणाले की: वृक्षगणना हे शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, तरी आपल्या सोसायटीमध्ये किंवा खाजगी मालमतेमध्ये जेव्हा प्रगणक वृक्षांची माहिती घेण्यासाठी येतील,तेव्हा त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या शास्त्रीय गणनेमुळे मुंबईतील हरित संपतीचा नेमका आकडा आणि स्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

व्यापक उपक्रम राबविण्यावर पालिका प्रशासनाचा भर

याचाच एक भाग म्हणून नुकतेच ‘वीरमाता जिजाबाई भोसले’ (राणी बाग) येथे एका विशेष प्रशिक्षण सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराला विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शवला.तज्ज्ञामार्फत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

Mumbai News: कूपरमध्ये जैविक कचऱ्याचा खच! मनुष्यबळ, कंत्राटी वादांचा फटका थेट आरोग्य व्यवस्थेला

या प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी पालिकेने विविध महाविद्यालयामध्येही शिबिरे सुरू केली आहेत. नुकतेच घाटकोपर येथील ‘राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज’ येथे अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, या शिबिरामध्ये वृक्षांची प्रजाती ओळखणे, त्याचे वय निश्चित करणे, वृक्षांच्या आरोग्याचा अभ्यास करणे आणि गणनेसाठी वापरली जाणारी आधुनिक तांत्रिक उपकरणे व मोबाईल अॅप कशी वापरावीत, याचे सखील मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Tree counting with modern equipment municipalities focus on training camps to increase public participation in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Mumabi
  • Tree
  • tree cutting

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.