Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अध्यक्षपदासाठी महायुतीतच ‘रस्सीखेच’; शिंदे शिवसेनेचे सदस्य भाजपच्या बाजूने असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा

शिवसेनेचे (शिंदे) दोन सदस्यही भाजपच्या बाजूने असल्याचा भाजपचा प्रबळ दावा असून एकूण ३१ सदस्यांचे संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे भाजपने सांगितले आहे. या संख्याबळावर मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा भाजपचा दावा आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 13, 2026 | 02:48 PM
अध्यक्षपदासाठी महायुतीतच 'रस्सीखेच'; शिंदे शिवसेनेचे सदस्य भाजपच्या बाजूने असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा

अध्यक्षपदासाठी महायुतीतच 'रस्सीखेच'; शिंदे शिवसेनेचे सदस्य भाजपच्या बाजूने असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा

Follow Us
Follow Us:

Latur  News: शिवसेनेचे (शिंदे) दोन सदस्यही भाजपच्या बाजूने असल्याचा भाजपचा प्रबळ दावा असून एकूण ३१ सदस्यांचे संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे भाजपने सांगितले आहे. या संख्याबळावर मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा भाजपचा दावा आहे. दुसरीकडे शिवसेनेचे (शिंदे) १५ सदस्य असून शिवसेना अभेद्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे) उबाठा आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेसाठी मोर्चेबांधणी केल्याचे सांगितले जात आहे. उबाठाचे ७, काँग्रेसचे ३, समाजवादी पक्षाचा एक सदस्य आणि ४ अपक्ष असे संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा सेनेकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर आपल्याकडेच असल्याचे सेनेचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील, उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे) आणि बांधकाम सभापतिपदी राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे यांना संधी देण्याची तयारी असल्याचे समजते. तसेच चार अपक्ष सदस्य सध्या भाजपसोबत असल्याचा दावा भाजपच्या स्थानिक सूत्रांकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचे आ. तानाजी सावंत यांच्या गोटात हे अपक्ष असल्याचा दावा फोल असल्याचेही भाजपकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक पातळीवर उबाठा किंवा काँग्रेससोबत युती मान्य होणार नाही.

त्यामुळे सावंत गटाचे आडाखे फोल ठरण्याची शक्यता असल्याचेही भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे उबाठा आणि काँग्रेसकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून या पक्षांचे जिल्ह्यातील नेतेही शांत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, निवडून आलेल्या सदस्यांना भाजपने आयोजित केलेल्या सहलीवर नेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून त्यामुळे भाजपची यंत्रणा सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या घडामोडींबाबत शिवसेनेचे (शिंदे) जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री शिवसेनाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला निर्णय जाहीर करतील. त्यानुसार स्थानिक पातळीवर आम्ही त्याची अंमलबजावणी करू. शिंदे हे उबाठा किंवा काँग्रेससोबत जाण्यास तयार होतील का या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अनधिकृतपणे सांगायचे झाले तर साहेब असे काही सांगणार नाहीत. मात्र ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुचकण्यात पडले आहेत.

Web Title: Tug of war for the presidency within the mahayuti itself office bearers claim shinde shiv sena members are siding with the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Municipal corporation Election 2026
  • Latur Politics

संबंधित बातम्या

Latur News : दिड लाखासाठी जामीन राहिलेल्या शेतकऱ्याची तब्बल सव्वा कोटीची जमीन हडपली!
1

Latur News : दिड लाखासाठी जामीन राहिलेल्या शेतकऱ्याची तब्बल सव्वा कोटीची जमीन हडपली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.