धुळे महानगरपालिकेतील अंदाजे 45 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी स्वतः धुळे शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पुराव्यांसह रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे शहरात…
शिवसेनेचे (शिंदे) दोन सदस्यही भाजपच्या बाजूने असल्याचा भाजपचा प्रबळ दावा असून एकूण ३१ सदस्यांचे संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे भाजपने सांगितले आहे. या संख्याबळावर मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा भाजपचा दावा आहे.
लातूर शहर महानगरपालिकेची मंगळवारी झालेली पहिली विशेष सर्वसाधारण सभा विविध मुद्यांवरून चांगलीच गाजली. स्थायी समिती व परिवहन समिती सदस्यांची निवड, स्वीकृत सदस्यांची नियुक्ती अशा मुद्द्यावर वाद झाला.
लातूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी सात जणांची नावे निवडीआधीच पक्षश्रेष्ठींनी जाहीर करुन सस्पेन्सची लॉटरी फोडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर काल सकाळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई सोनकांबळे आणि नूतन उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे यांनी आपापल्या पदांचा अधिकृत पदभार स्वीकारला.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जळकोटमध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले.
लातूर महानगरपालिकेचे रणांगण आटोपल्यानंतर निकाल जाहीर होताच, स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागण्यासाठी काँग्रेस आणि BJP या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी जमू लागली आहे. राजकारणी मुंडावळ्या बांधलेले इच्छुक देखील जमू लागले.
शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेले अपक्ष उमेदवार श्रीकांत रांजणकर यांनी मात्र प्रतिनिधीशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उपरणे घालून आमचे स्वागत केल्याचे सांगितले.
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून शहरातील राजकीय वातावरण तापलेल्या स्वरूपात दिसत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, विकासघोषणा व वचननाम्यांची चढाओढ सुरु आहे.