Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांवरील कँटीनकडे; सिल्लोडमध्ये FDA ची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील कँटीनवर धडक कारवाई केली. अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींचा अभाव आढळल्यानंतर कँटीनचा परवाना निलंबित करून ते बंद करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 08:55 PM
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Follow Us
Follow Us:
  • सिल्लोड एसटी डेपोतील कँटीनवर FDA ची धडक कारवाई.
  • अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नसणे आणि आवश्यक रेकॉर्डचा अभाव आढळला.
  • अन्न भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश.
 

राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला असून आता बस स्थानकांवरील कँटीनही प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड एसटी बस डेपोतील कँटीनवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कँटीनचा परवाना निलंबित करून ते बंद करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवायांना वेग आल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कारवाईचा मोर्चा चायनीज स्टॉल्ससह विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांकडे वळवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर बस स्थानकांवरील कँटीनची तपासणीही सुरू झाली आहे.

सिल्लोडच्या कँटीनमध्ये अनेक त्रुटी

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत झालेल्या तपासणीत कँटीनमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. फरशी आणि स्वयंपाकघर अस्वच्छ असल्यासोबतच भिंतींचे पापुद्रे निघालेले होते. खिडक्यांना आवश्यक जाळ्या नसल्याचेही तपासणीत समोर आले.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

पाण्याच्या तपासणीचा अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. त्यांच्याकडे ॲप्रोन आणि हातमोजेही नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

याशिवाय खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड अपूर्ण होते. चणाडाळीच्या साठ्याबाबत आवश्यक नोंदी, साफसफाईची माहिती आणि कीटक नियंत्रणाशी संबंधित रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही आढळले. या गंभीर त्रुटींमुळे प्रशासनाने कँटीनचा परवाना निलंबित करून ते बंद केले.

अन्न भेसळखोरांवर कठोर कारवाईचे निर्देश

दरम्यान, अन्न भेसळीविरोधातील कारवायांना अधिक कडक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला केली.

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

नागरिकांच्या आरोग्याशी, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात संघटित गुन्हेगारीच्या तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सिल्लोडमधील कारवाईनंतर राज्यातील इतर बस स्थानकांवरील कँटीनच्या स्वच्छता आणि अन्न सुरक्षा व्यवस्थेकडेही प्रशासनाचे लक्ष जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्येही आता सतर्कता वाढली आहे.

Web Title: Tukaram mundhe fda action sillod st bus stand canteen sealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Raid
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
1

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
2

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका
3

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका

Tukaram Mundhe: पुण्यातील दारूकांडानंतर FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये! तुकाराम मुंडे म्हणाले, ‘मद्यावर कारवाई…’
4

Tukaram Mundhe: पुण्यातील दारूकांडानंतर FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये! तुकाराम मुंडे म्हणाले, ‘मद्यावर कारवाई…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.