Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना ‘क्लिन चिट’; आमदार खोपडेंनी केलेली ‘ती’ मागणीही फेटाळली

स्मार्ट सिटीतच कार्यरत दोन महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही महिलांनी त्यांच्याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दिली. या सर्व प्रकरणी तत्कालीन महापौर व विद्यमान आमदार संदीप जोशी यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 13, 2025 | 08:31 AM
तुकाराम मुंढेंना 'क्लिन चिट'; आमदार खोपडेंनी केलेली 'ती' मागणीही फेटाळली

तुकाराम मुंढेंना 'क्लिन चिट'; आमदार खोपडेंनी केलेली 'ती' मागणीही फेटाळली

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आयएएस तुकाराम मुंढे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी आमदाराकडून करण्यात आली होती. मुंढे हे त्यावेळी नागपूर महापालिकेचे आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ होते. याच पदावर असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपानंतर चौकशी होऊन त्यांना क्लिन चिट मिळाली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, महिला अधिकाऱ्यांशी गैरव्यवहारप्रकरणी येत्या महिनाभरात अहवाल आल्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. मुंढे यांची पोलिस महासंचालक व मुख्य सचिवांमार्फत चौकशी करून बडतर्फ करावे, अशी मागणी आमदार खोपडे यांनी केली होती. मात्र, ती मागणी आता फेटाळण्यात आली आहे. खोपडे म्हणाले, मुंढे यांनी महानगरपालिकेच्या ७ महिन्यांच्या काळात रूजू होताच १७ सफाई कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले.

हेदेखील वाचा : IAS Tukaram Mundhe : 20 वर्षात तब्बल 24 वेळा बदली; आता तर थेट राजीनाम्याची मागणी, ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं

तसेच, त्यानंतर कोविड काळात नागपूरजवळील एका मोकळ्या ठिकाणी ५ हजार बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारले. वादळ वाऱ्याने ते उद्ध्वस्त झाले. परिणामी, कोट्यवधींचे नुकसान झाले तर, स्मार्ट सिटीचे कार्यकारी सीईओ असताना त्यांनी एका कंत्राटदाराची ४० कोटींची देयके मंजूर केली. त्यांना धनादेशावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी मंजुरी दिली, हे बेकायदेशीर होते.

स्मार्ट सिटीतच कार्यरत दोन महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही महिलांनी त्यांच्याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दिली. या सर्व प्रकरणी तत्कालीन महापौर व विद्यमान आमदार संदीप जोशी यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. तसेच सदर पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने गुन्हाही दाखल केला. आमदार प्रवीण दटके यांनी २०२० मधील प्रकरणात आता त्यांनी मंजूर केलेल्या कामांना कार्योत्तर मंजुरी का दिली? असा प्रश्न उपस्थित करत भ्रष्टाचारप्रकरणी पोलिस व ईओडब्ल्यूच्या चौकशीचे अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी केली.

चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई होणार

मंत्री सामंत यांनी मुंढे यांना स्मार्ट सीईओ म्हणून काम करण्याचे अधिकार बृहन्मुंबईचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले. तसेच, त्यांच्या पदभाराचेही पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी असल्याचे सांगितले. २ चौकशीत मुंढे निर्दोष निघाले तर, महिला गैरव्यवहारप्रकरणी राधिका रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात हा अहवाल आल्यानंतर यातील तथ्यानुसार कारवाई होईल, अशी ग्वाही दिली.

Web Title: Tukaram mundhe gets a clean chit the demand made by mla krishna khopade was also rejected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील आता ‘या’ मागणीसाठी जाणार दिल्लीला; 15 डिसेंबरला असेल दौरा
1

मनोज जरांगे पाटील आता ‘या’ मागणीसाठी जाणार दिल्लीला; 15 डिसेंबरला असेल दौरा

राज्यातील 5800 पेक्षा अधिक निवासी डॉक्टरांवर मोठं संकट; ‘मार्ड’च्या सर्वेक्षणातून अनेक बाबी उघड
2

राज्यातील 5800 पेक्षा अधिक निवासी डॉक्टरांवर मोठं संकट; ‘मार्ड’च्या सर्वेक्षणातून अनेक बाबी उघड

18 विकासकांना नवी मुंबई पालिकेचा दणका! बांधकाम स्थगितीची नवी मुंबई पालिकेची कारवाई
3

18 विकासकांना नवी मुंबई पालिकेचा दणका! बांधकाम स्थगितीची नवी मुंबई पालिकेची कारवाई

नवी मुंबईत केवळ 111 जागा आणि BJP मध्ये तब्बल 700 पेक्षा अधिक इच्छुक, छाननी करून प्रदेशाकडे पाठवण्यात येणार यादी
4

नवी मुंबईत केवळ 111 जागा आणि BJP मध्ये तब्बल 700 पेक्षा अधिक इच्छुक, छाननी करून प्रदेशाकडे पाठवण्यात येणार यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.