Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Railway : गौरी-गणपतीसाठी रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘या’ रेल्वे स्थानकात विशेष सेवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 20, 2025 | 04:28 PM
Konkan Railway : गौरी-गणपतीसाठी रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘या’ रेल्वे स्थानकात विशेष सेवा
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

गणेशोत्सव सुरु व्हायच्या तिन महिने आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेशभक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेशभक्तांची वेळ वाया जाते आणि रांगेत उभे राहून दमछाक होत होती. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनने ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण सुरु करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करुन घेतली.

Kokan Railway : गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, करा लगेच तिकीट बुक, कसं ते जाणून घ्या

20 जून 2025 ते 5 जुलै 2025 या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारती समोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या (खिडकी क्रमांक 7 आणि 8) सुरु राहणार आहेत. आज 20 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी या दोन खिडक्यांचे उद्घाटन केले.यावेळी शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, शहर संघटक भास्कर पाटील, सचिव बाळा गवस, रेल्वेचे अधिकारी रणजित झा, स्टेशन मास्तर केशव तावडे, प्रमिला देवगण, लकी कुमार, मिलिंद शिंदे, अनिल देवधर, दिनेश कुमार, संजीव कुलकर्णी, किरण नाक्ती, प्रकाश पायरे, रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष बोडके, प्रितम रजपूत, निखिल बुजबुडे, अशोक कदम, विकास पाटील, मनोज गुप्ता, कुणाल पाटील, रुपेश पाटील, साहिल परब, मनिष साळवे, गणेश मुकादम, सचिन चांदुगडे, वसंत बोंडभर, बाळा केदार, प्रवासी संघटनेचे महेंद्र जाधव, सुरेश पालांडे, निलेश गवंडे, प्रदीप शितव, प्रदीप वारिसे, प्रविण बने, सुनिल बागुल, मिलिंद वायकर, शिवसैनिक आणि युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Two additional reservation windows for tickets have been opened at thane railway station for the servants going by train for gauri ganpati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • konkan railway
  • Naresh Mhaske
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
1

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
3

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव
4

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.