फोटो सौजन्य: गुगल
Kokan Railway : ‘येवा कोकण आपलाच आसा’ असं म्हणत कोकणकर चाकरमान्यांचे स्वागत करतात. कोकण म्हटलं की आठवतो तो ते पाऊस, गणपती आणि गावी जाण्यासाठीची कोकण रेल्वे.याच कोकण रेल्वेची महत्वाची अपडेट आता समोर येत आहे. कोकण रेल्वेसंदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे रेल्वे आरक्षणाचे वेळापत्रक जारी झालेलं आहे. त्याचबरोबर कोकणात जाण्यासाठी आता बुकींग सेवा देखील सुरु होत आहे. रेल्वेच्या नियमांप्रमाणे 2 महिने आधी बुकिंग प्रक्रिया करणं अनिवार्य असतं. त्यामुळे आता गणेशोत्सावासाठी जर तुम्हाला ही गावी जायचं असेल तर कोकण रेल्वेकडून बुकींग सेवा सुरु करण्यात येत आहे.
कोकण रेल्वेसंदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे रेल्वे आरक्षणाचे वेळापत्रक जारी झालेलं आहेच. रेल्वेच्या नियमांप्रमाणे 2 महिने आधी बुकिंग प्रक्रिया करणं अनिवार्य असतं. यंदा गणपती 27ऑगस्ट येत असल्याने गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 23जून पासून बुकींग करावं लागणार आहे. असं असलं तरी गणेश चतुर्थीच्या आधी 2 दिवस चाकरमानी कोकणात जात असल्याने 25आणि 26 ऑगस्टला कोकणात पोहोचण्यासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी देखील जास्त प्रमाणात मागणी होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाण्य़ासाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र यासाठी चाकरमान्यांना दोन महिने आधी बुकींग करणं अनिवार्य आहे. त्यामुळे इतर वेळापत्रकाबरोबर कोकणात जाण्यासाठीच्या आरक्षित गाड्यांचे बुकींग सुद्धा सुरु करण्यात येत आहे. यंदा गणपती 27 ऑगस्टला येत असल्याने गणपती स्पेशल गाड्यांसाठी 23 जूनपासून बुकींग सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पाऊस असतानाही वेळेत पोहोचता यावं तसंच त्यांना योग्य सेवा मिळावी यासाठी रेल्वेने सुविधा देखील जाहीर केल्या आहेत.
रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक जारी झालं आहे. गणेश चतुर्थीच्यापार्श्वभूमीवर वातावरणातील बदल लक्षात घेत त्याप्रमाणे गाड्यांचे वेळेत फेरफार करण्यात येतील. गणपतीच्य़ा दोन दिवस आधीपर्यंत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी गणपतीच्या 2 दिवस आधीपर्यंत आरक्षित गाड्यांची मागणी असते. त्यामुळे यंदाही कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असल्यामुळे मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे मार्गावर 250 हून अधिक गणपती स्पेशल गाड्या सोडण्यात येत आहेत. अचानक येणाऱ्या पावसामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष उपाययोजना देखील राबविण्यात येणार आहे.