मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून शंभर कोटी रुपयांचे वसुली करण्याचे निर्देश दिल्या प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज ( 18 जुलै ) दिल्ली सीबीआयकडून राज्याचे माजी दोन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि संजय पांडे यांची 6 तास चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली ( आहे.
अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसुलीचे आरोप लावले होते. त्यानतंर या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वकील जयश्री पाटील यांनी केली होती. मग या प्रकरणात सीबीआय गुन्हा दाखल केला होता. तर, अनिल देशमुख यांच्यावर लावलेले आरोप मागे घेण्यासाठी परमबीर सिंग यांना सांगितले होते, असा आरोप संजय पांडे यांच्यावर लावण्यात आला होता.