Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी करमाळ्याच्या PSI सह दोन कर्मचारी निलंबित; सीआयडीमार्फत तपास सुरू

तपास गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती असून, सीआयडीमार्फतही तपास सुरू आहे. या तपासा दरम्यान संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2026 | 08:14 AM
पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी करमाळ्याच्या PSI सह दोन कर्मचारी निलंबित; सीआयडीमार्फत तपास सुरू

पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी करमाळ्याच्या PSI सह दोन कर्मचारी निलंबित; सीआयडीमार्फत तपास सुरू

Follow Us
Follow Us:
  • स्वतःला जखमी करून घेतलेल्या आरोपीचा मृत्यू
  • भिंतीवर डोके आपटून जखमी 
  • PSI सह दोन कर्मचारी निलंबित
करमाळा : करमाळा पोलीस कोठडीत असताना स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय 38, रा. बिटरगाव, सांगवी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एका पीएसआयसह दोन पोलीस कॉन्स्टेबल अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस तपास अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते.

कृष्णा ज्ञानदेव मोहिते याच्याविरुद्ध त्यांच्या नातेवाईक असलेल्या महिलेने फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला 20 ऑक्टोबर 2026 ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. पोलीस कोठडीतील पहिल्याच दिवशी 20 ऑक्टोबर रोजी कृष्णा मोहिते याने भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी प्रथम करमाळा येथील कुटीर रुग्णालयात आणि पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना 23 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. नातेवाईकांनी त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती असून, सीआयडीमार्फतही तपास सुरू आहे. या तपासा दरम्यान संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने त्याचदिवशी कार्यरत असणारे पीएसआय उघडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रणदील आणि कादगे या तिघांना निलंबित करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिघांना निलंबित केले असल्याचे समजते. कृष्णा मोहिते याच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती काय होती आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते हे सीआयडीच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

FAQ

प्रश्न 1: करमाळा पोलीस कोठडीतील मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

उत्तर: मृत व्यक्तीचे नाव कृष्णा ज्ञानदेव मोहिते आहे.

प्रश्न 2: मृत व्यक्तीचे वय किती होते?

उत्तर: कृष्णा ज्ञानदेव मोहिते यांचे वय 38 वर्षे होते.

प्रश्न 3: ही घटना कुठे घडली?

उत्तर: ही घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलीस ठाण्याच्या कोठडीत घडली.

Web Title: Two personnel including a psi from karmala suspended following the death of an accused in police custody nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 08:14 AM

Topics:  

  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: मोहिते-पाटलांमुळे जिल्हा बँक अडचणीत! सचिन कल्याणशेट्टींचा घणाघात
1

Solapur News: मोहिते-पाटलांमुळे जिल्हा बँक अडचणीत! सचिन कल्याणशेट्टींचा घणाघात

Solapur News : फटाके स्टॉलचे यंदा क्षमतेनुसार वाटप; पुढील वर्षापासून सर्व स्टॉल होम मैदानावर!
2

Solapur News : फटाके स्टॉलचे यंदा क्षमतेनुसार वाटप; पुढील वर्षापासून सर्व स्टॉल होम मैदानावर!

Solapur DCC Bank Election : शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन; रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक
3

Solapur DCC Bank Election : शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन; रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक

Solapur District Bank : ‘रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा’; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक
4

Solapur District Bank : ‘रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा’; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.