Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur DCC Bank Election : शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन; रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर सहकार क्षेत्रातील नेत्यांची बैठक पार पडली.

  • By विवेक
Updated On: Oct 25, 2026 | 08:59 PM
Solapur dcc bank

Solapur dcc bank

Follow Us
Follow Us:
  • सोलापूर DCC बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये बैठक
  • विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार नेत्यांची चर्चा
  • रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन
 

अकलूज : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC) आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख सहकार नेते आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. (Solapur DCC Bank Election)

या बैठकीत माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मांडलेली भूमिका ही संपूर्ण जिल्ह्यासाठी चर्चेची आणि सकारात्मक दिशादर्शक ठरणार आहे.

‘बँक कोणत्याही एका पक्षाची नाही, ती शेतकऱ्यांची आहे’ – रणजितसिंह मोहिते-पाटील

बैठकीत बोलताना रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, “जिल्हा मध्यवर्ती बँक ही केवळ एक बँक नाही, तर ती लाखो शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. माझ्या शेतकरी बांधवाच्या शेतातील पीक याच बँकेच्या कर्जावर उभे राहते. त्यामुळे या निवडणुकीकडे कोणत्याही एका राजकीय पक्षाची प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून न पाहता, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्वांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज आहे.”

Navrashtra Impact : शेवगावमधील हजारो झाडांच्या कत्तलीप्रकरणी सत्यजित तांबे आक्रमक! मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

सहकार चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विठ्ठलराव शिंदे, अभयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी या सहकाराचा पाया रचला आहे. या गौरवशाली परंपरेचे जतन करण्यासाठी राजकीय मतभेद, पक्षभेद बाजूला ठेवून जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एका छताखाली यावे, हीच आमची प्रामाणिक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सकारात्मक प्रयत्न

सोलापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट, पारदर्शक आणि शेतकरी हितैषी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे आश्वासनही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिले. त्यांच्या या सर्वसमावेशक भूमिकेचे जिल्हाभरातील सहकार क्षेत्रातून स्वागत होत आहे. बँक निवडणुकीत राजकारणापेक्षा सहकार्याला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

भाजपच्या बैठकीनंतर सर्वांचे लक्ष मोहिते-पाटील यांच्या आवाहनाकडे

दरम्यान, निवडणुकीची घोषणा होताच भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री *जयकुमार गोरे* यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि समविचारी नेत्यांची स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. त्या बैठकीतही DCC बँक निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली.

आता रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सर्वपक्षीय एकजुटीचे आणि बिनविरोध निवडणुकीचे जे सकारात्मक आवाहन केले आहे, त्याला भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे कसा प्रतिसाद देतात? राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी सर्व नेते एकत्र येतात का? याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जर सर्व नेते एकत्र आले तर सोलापूर DCC बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक म्हणून अधिक ताकदीने उभी राहील, अशी चर्चा आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Washim: २ लाख ८५ हजार बालकांना जंतनाशक गोळी; पात्र बालक वंचित राहू नये, जिल्हाधिकारी कुंभजकर यांचे निर्देश

Web Title: Solapur dcc bank election ranjitsinh mohite patil vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Solapur News : फटाके स्टॉलचे यंदा क्षमतेनुसार वाटप; पुढील वर्षापासून सर्व स्टॉल होम मैदानावर!
1

Solapur News : फटाके स्टॉलचे यंदा क्षमतेनुसार वाटप; पुढील वर्षापासून सर्व स्टॉल होम मैदानावर!

Solapur District Bank : ‘रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा’; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक
2

Solapur District Bank : ‘रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा’; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक

Solapur News: मोहोळ–तुळजापूर पाणीप्रश्नी तोडगा, बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
3

Solapur News: मोहोळ–तुळजापूर पाणीप्रश्नी तोडगा, बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.